26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeपरभणीपरभणी हातगाडे चालकांची जागेवरच आरटीपीसीआर तपासणी

परभणी हातगाडे चालकांची जागेवरच आरटीपीसीआर तपासणी

एकमत ऑनलाईन

परभणी : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या पार्श्वभुमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. संचारबंदीचे पालन करण्याच्या वारंवार सुचना देवूनही भाजी व फळविक्रेते शहरातील अनेक भागात व्यवसाय करत होते. नियम मोडणा-या अशा हातगाडे चालकांविरूध्द शुक्रवारी (दि.7) उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या पथकांनी शहरातील रस्त्यावर उतरून भाजीपाला व फळविक्रेत्या गाडेवाल्याच्या जागेवरच आरटीपीसीआर तपासण्या सुरू केल्या.

संचारबंदी जाहीर असतानाही शहरातील गांधीपार्क, स्टेशनरोड, वसमतरोड आदि भागात भाजीपाला व फळविक्रेते हातगाड्यावरून सर्रास व्यवसाय करताना दिसून येत होते. त्यामुळे या गाड्यावर नागरिक देखील खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळत होते. प्रशासनाने या विरूध्द कारवाई करण्याची अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत होती. या पार्श्वभुमीवर डॉ.कुंडेटकर यांनी सुरू केलेल्या कारवाईचे नागरिकातून स्वागत होताना दिसून येत आहे.

कुवेतवरून २१५ टन ऑक्सिजन घेऊन तीन युद्धनौका रवाना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या