23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeपरभणीभरधाव क्रुझरवर धडकल्याने रूईचा मृत्यू

भरधाव क्रुझरवर धडकल्याने रूईचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

जिंतूर : तालुक्यातील शेवडी परिसरात जिंतूर- येलदरी रस्त्यावर रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास भरधाव क्रुझर वाहनावर रुई प्राणी येऊन धडकला. या आघातात रूईचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. जिंतूर तालुक्यात वन्य प्राण्यांची संख्या मोठी आहे.

तालुक्यातील सर्व रस्त्यावरून दररोज वन्यप्राणी वावरत असतात जिंतूर- येलदरी रस्त्यावरील शेवडी जवळ रविवार, दि.०१ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास क्रुझर क्र.एम.एच. २२ ४५७४ हे वाहन भरधाव वेगाने रस्त्यावरून जात असताना त्यावर रुई हा वन्य प्राणी येऊन धडकला. यात रुईचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. घटने नंतर घटनास्थळावर नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

त्या नंतर काही ग्रामस्थांनी वन विभागाला फोन केल्यानंतर तब्बल दीड- दोन तासानंतर वन विभागातील वनपाल गणेश घुगे, वन मजूर गजानन काकडे, नागनाथ शेळके व ग्रामस्थांनी अपघातग्रस्त रूईला जिंतूर तालुका पशु वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. डॉ. चव्हाण यांनी शव विच्छेदन केले असून रुईच्या मृत्यूप्रकरणी क्रुझर वाहन चालकावर गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची माहिती वनपाल गणेश पालवे यांनी दिली आहे.

२९ देशांमध्ये ऑक्सिजनची कमतरता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या