26.9 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home परभणी धावती खासगी बस जळून खाक

धावती खासगी बस जळून खाक

एकमत ऑनलाईन

चारठाणा : धावत्या खासगी आराम बसने पेट घेतल्याची घटना जिंतूर- जालना महामार्गावर मान्केश्वर पाटीजवळ शुक्रवारी (दि.8) सकाळी ७.३०च्या सुमारास घडली. या घटनेत बस पूर्णत: जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. पुण्याहून हिंगोलीकडे जाणारी एक खासगी आराम बस शुक्रवारी सकाळी ७.३०च्या सुमारास जिंतुरकडे जात होती. मान्केश्वर पाटीजवळ आली असताना बसने अचानक पेट घेतला. बसने पेट घेतल्याचे लक्षात येताच आतमधील प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. परंतू प्रसंगावधान राखत वेळीच बसमधील प्रवाशांना तात्काळ खाली उतरवण्यात आले.

याबाबत चारठाणा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बळवंत जमादार कर्मचा-यांसह घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी व पोलिसांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले. परंतू बस जळून खाक झाली. या बसमध्ये 12 प्रवाशी प्रवास करत होते. कुणालाही ईजा झाली नसुन सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक बळवंत जमादार यांनी दिली. आगीचे कारण मात्र कळू शकले नाही.

लोकशाही बळकट होण्यासाठी…

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,439FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या