जिंतूर : येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य बळीराम वटाणे तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ शिक्षक एस.एस.इंगळे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर संगीत विभागातर्फे गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे गीत सादर केले. आजच्या कार्यक्रमात हरिओम कंठाळे या विद्यार्थ्याने संत गाडगेबाबा यांची वेशभूषा साकारली होती.
यानंतर मयुरी सांगळे, हर्षदा रुघे व समीक्षा भाकरे या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. यानंतर एम.जी.मोरे यांनी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्यानंतर प्राचार्य वटाणे यांनी स्वच्छतेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन कल्याण भोसले यांनी तर आभार प्रदीप चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.