26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeपरभणीपरभणी जिल्ह्यातील दिंडी मार्गावर सामसुम

परभणी जिल्ह्यातील दिंडी मार्गावर सामसुम

एकमत ऑनलाईन

परभणी : मराठवाड्यासह विदभार्तील बहुतांशी जिल्ह्यातून विविध संस्थानच्या शेकडो पालख्या, दिंड्यांनी सलग दुसर्‍यावर्षी पंढरपूरकडे प्रस्थान न केल्याने या जिल्ह्यातील दिंडीमार्ग अक्षरश: सुनसुना जाणवतो आहे. या जिल्ह्यातून दरवर्षी हिंगोली, नांदेड तसेच विदभार्तील बहुतांशी जिल्ह्यातील विविध संस्थानच्या शेकडो पालख्या व दिंड्या तसेच हजारो वारकरी पायपीट करीत पंढरपूरकडे प्रस्थान करीत आले आहेत. त्यामुळेच आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर तब्बल एक महिनाभर या जिल्ह्यातील दिंडीमार्ग या पालख्या व दिंड्यांनी तसेच हजारो वारकर्‍यांच्या टाळ, मृदंगांच्या, विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमत राहीले आहेत.

नांदेड व हिंगोली जिल्ह्याच्या सिमेवरील झिरोफाट्यापासून परभणी, गंगाखेड ते परळी, हिंगोली जिल्ह्याच्या सिमेवरील येलदरीपासून जिंतूर, परभणी, गंगाखेड तसेच देवगावफाट्यामार्फे सेलू, पाथरी, सोनपेठमार्गे पुढे परळी वगैरे दिंडी मार्गांवर हे चित्र आषाढीच्या आधी सातत्याने दिसत आले आहेत. विशेषत: या दिंडीमार्गावरील तीर्थक्षेत्र शेगांव येथील गजानन महाराजांच्या दिंडीचे आगमन व प्रस्थान या दिंडीमार्गाच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण बाब ठरली आहे. परंतु, गेल्या वर्षी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुभार्वाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने निर्बंध लादल्यानंतर विविध संस्थानच्या या दिंड्या व पालख्या निघाल्याच नाहीत. त्याहीवर्षी हे दिंडीमार्ग पूर्णत: सामसूम होते. याहीवर्षी तेच चित्र पून्हा कायम आहे.

कोरोनाची लाट ओसरल्यानंतरसुध्दा राज्य सरकारने या पालखी व दिंड्यांना परवानगी बहाल केली नाही. त्यामुळे विविध संस्थानच्या पालख्या व दिंड्या निघाल्या नाहीत. किंवा वारकरीसुध्दा वारीस निघाले नाहीत. दरम्यान, राज्य सरकारने लादलेल्या निबंर्धांमुळे विविध संस्थानचे पदाधिकारी व वारकरी कमालीचे हिरमुसले आहेत. काहींनी त्या विरोधात संतप्त प्रतिक्रियाही नोंदविल्या आहेत.

अखेर ‘रोमियो’ भारतीय नौदलाला हस्तांतरीत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या