17.5 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeपरभणीपालम न्यायालय इमारत परीसरातील विविध कामांना मिळाली मंजुरी

पालम न्यायालय इमारत परीसरातील विविध कामांना मिळाली मंजुरी

एकमत ऑनलाईन

गंगाखेड : पालम तालुका न्यायालयास मोठी इमारत उपलब्ध आहे. परंतु पायाभुत सुविधांची वानवा जानवत होती. शहरासह तालुक्यातील तब्बल ८७ गावातील नागरिकांना तसेच वकील व न्यायालयीन कर्मचारी यांना वाहने उभी करण्यासाठी सुविधा उपलब्ध नव्हती. तसेच इतर काही पायाभुत सुविधांची गरज असल्याचे लक्षात घेऊन आ.डॉÞरत्नाकर गुट्टे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्यानुसार न्यायालय इमारतीच्या परिसरात संरक्षक भिंत, वाहनतळ, ध्वजस्तंभ, बाग, सुरक्षारक्षक चौकी, बा विद्युतकरण अशा विविध कामांसाठी नुकतीच मंजुरी मिळाली आहे.

विविध विकास कामांना मिळालेल्या मंजुरी नुसार अनुक्रमे रु.२,२०,६२,००० आणि उर्वरित कामासाठी रु.७४,०२,००० असा एकूण २,९४,६४,००० निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे लवकरच कामांची पायाभरणी होणार असल्याचे सांगितले जात आहे. न्यायालय इमारतीच्या परिसरात उभारण्यात येणा-या पायाभुत सुविधांमुळे सुरक्षेचा प्रश्न मिटणार असून परिसराचा कायापालट सुध्दा होणार आहे.

तालुका न्यायालयात पायाभुत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे गेली अनेक महिने प्रयत्नशील होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने सदरील कामास अंतिम मंजुरी मिळाली आहे. त्या संदर्भातली अंतिम मंजुरी पत्रे नुकतीच आ.डॉ.गुट्टे यांच्या कार्यालयास प्राप्त झाली आहेत. त्यामुळे न्यायालयीन इमारतीचा कायापालट होण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, यशस्वी पाठपुरावा करून न्यायालयीन पायाभुत सुविधांचा प्रश्न मार्गी निकाली काढल्यामुळे पालम शहरासह तालुक्यातील नागरिक आ.डॉ.गुट्टे यांचे अभिनंदन करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या