मानवत : येथिल ग्रामीण रूग्णालय कार्यक्षेत्राअंतर्गत क्षय रूग्णाना दत्तक घेऊन पूरक पोषण आहाराचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा उपक्रम येथील सारथी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला.
राष्ट्रपतींनी ९ सप्टेंबर २०२२ रोजी टी.बी मुक्त भारत अभियानाची सुरुवात केली आहे. या अभियानांतर्गत उपचाराखाली असलेल्या क्षय रुग्णांना पूरक पोषण आहाराची व्यवस्था करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत येथील सारथी फाउंडेशन यांच्यावतीने ग्रामीण रुग्णालय मानवत अंतर्गत एकूण १५ रुग्णांना दत्तक घेऊन पुढील सहा महिन्यासाठी पूरक पोषण आहार देण्यात येणार आहे.
या रुग्णांना प्रोटीन युक्त आहाराची नित्यांत गरज असते म्हणून सारथी फाउंडेशन यांनी पोषन आहार सोबत प्रोटीन पावडर देखील दिले. यामुळे क्षय रुग्ण बरा होण्यास निश्चितच मदत होते. सामाजिक बांधिलकी जपत तीन वर्षे झाली सारथी फाउंडेशन यांनी विविध उपक्रम मानवतमध्ये राबवले आहेत. सारथी फाउंडेशनच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.