27 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home परभणी जिल्ह्यातील शाळा पहिल्याच दिवशी गजबजल्या

जिल्ह्यातील शाळा पहिल्याच दिवशी गजबजल्या

एकमत ऑनलाईन

परभणी: तब्बल दहा महिन्याच्या कालावधीनंतर इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गांना बुधवारपासून सुरुवात झाल्याने आज पहिल्याच दिवशी सर्व शाळा गजबजल्या होत्या. जिल्ह्यातील सर्व शाळांतील पाचवी ते आठवीचे वर्ग 27 जानेवारीपासून सुरू करण्यात यावेत, असे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले होते. शाळेत येणा-या विद्यार्थ्यांनी मास्क घालूनच शाळेत यावे, त्याचबरोबर शाळांनी कोविड-19 च्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी श्री दीपक मुगळीकर यांनी बजावले होते.

इयत्ता नववी ते बारावी वर्ग यापूर्वीच सुरू झाले आहेत. त्या सर्व वगार्ना विद्यार्थी उपस्थित राहत असून संख्या पूर्ण असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. बुधवारपासून इयत्ता पाचवी ते आठवी वर्गांना सकाळी नऊच्या सुमारास परभणी शहरासह जिल्ह्यातील शाळांतून प्रारंभ झाला. शहरातील सर्व शाळा यामुळे गजबाजून निघाल्या. शाळेत प्रवेश करता झालेल्या विद्यार्थ्यांचे गणने तापमान घेतल्या गेले. त्याचबरोबर सैनीटायझरने हात धुऊन घेण्यात येत होते. त्यानंतरच शाळेत विद्यार्थी शाळेत प्रवेश करत होते.

फेब्रुवारीत आयपीएल खेळाडूंचा लिलाव

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,434FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या