26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeपरभणीचुलीवर स्वंयपाक करून नोंदविला महागाईचा निषेध

चुलीवर स्वंयपाक करून नोंदविला महागाईचा निषेध

एकमत ऑनलाईन

परभणी : महागाई, जीएसटी, बेरोजगारी व अग्निपथ योजनेच्या विरोधात काँग्रेस पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी शुक्रवार, दि. ५ ऑगस्ट रोजी परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. संतप्त कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी चूल पेटवून स्वंयपाक करीत केंद्र सरकारच्या निषेध नोंदविला यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत परीसर दणाणून सोडला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने गेल्या काही वर्षांपासून चुकीची धोरणे अवलंबिली असून मनमानी कारभार सुरू केल्याने महागाईचा आगडोंब उसळला असल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिका-यांनी केला. जीवनाशक वस्तूंवरही जीएसटी लावल्याने सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक गणिते बिघडवून टाकली आहेत. पेट्रोल, डिझेल, गॅस, सीएनजी, पीएनजीचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत, महागाईने जनता होरपळून निघत असतानाच दूूध, दही, पनीर, तूप यांच्यासह अन्य जीवनावश्यक वस्तूंवरही जीएसटी लादली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यांवरही जीएसटी लावल्याने सर्वसामान्यांना शिक्षणही महाग झाले आहेÞ रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णांवरही जीएसटी लावणे भयावह असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

या संदर्भात जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष आ. सुरेश वरपूडकर, महानगर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार यांनी जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात महागाईसह अन्य चुकीच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला आहे. तसेच अतिवृष्टी ग्रस्त भागातील शेतक-यांना सर्वतोपरी मदत करावी अशी अपेक्षा या निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे. काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित केलेल्या या निदर्शनात ज्येष्ठ नेते भगवानराव वाघमारे, बाळासाहेब देशमुख, मलेका गफार, श्रीधरराव देशमुख, गफार मास्टर, जयश्री खोबे, इरफानूर रहमान खान, विनोद कदम, गुलमीर खान, मिनाज कादरी, तुकाराम साठे, बाळासाहेब रेंगे, श्रीमती दुर्रानी, सत्तार पटेल, दिगंबर खरवडे, अब्दुल सत्तार, सुहास पंडित, जानू बी, श्रीकांत पाटील आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या