25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeपरभणीसेलू नगर पालिका आरक्षण सोडत जाहीर

सेलू नगर पालिका आरक्षण सोडत जाहीर

एकमत ऑनलाईन

सेलू : येथील मुदत संपलेल्या नगरपालिकेचा आरक्षण सोडतिचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून नगरपालिका सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला सर्व साधारण प्रवर्गातील आरक्षण सोडत मुख्याधिकारी यांच्या मार्फत सोमवार, दि.१३ जून रोजी जाहीर करण्यात आली आहे.

या आरक्षण सोडतीत प्रभाग क्रमांक ०१ अ अनुसूचित जाती, ०१ ब सर्व साधारण स्त्री, प्रभाग क्रमांक ०२ अ सर्व साधारण स्त्री, ०२ ब सर्व साधारण, प्रभाग क्रमांक ०३ अ सर्व साधारण स्त्री, ०३ ब सर्व साधारण, प्रभाग क्रमांक ०४ अ अनुसूचित जमाती, ०४ ब सर्व साधारण स्त्री, प्रभाग क्रमांक ०५ अ अनुसूचित जाती स्त्री, ०५ ब सर्व साधारण, प्रभाग क्रमांक ०६ अ सर्व साधारण स्त्री, ०६ ब सर्व साधारण, प्रभाग क्रमांक ०७ अ सर्व साधारण स्त्री, ०७ ब सर्व साधारण, प्रभाग क्रमांक ०८ अ सर्व साधारण स्त्री, ०८ ब सर्व साधारण, प्रभाग क्रमांक ०९ अ सर्व साधारण स्त्री, ०९ ब सर्व साधारण, प्रभाग क्रमांक १०अ सर्व साधारण स्त्री, १०ब सर्व साधारण, प्रभाग क्रमांक ११ अ सर्व साधारण स्त्री, ११ ब सर्व साधारण, प्रभाग क्रमांक १२ अ सर्व साधारण स्त्री, १२ ब सर्व साधारण, प्रभाग क्रमांक १३ अ अनुसूचित जाती स्त्री, १३ ब सर्व साधारण या पद्धतीने आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे़ १३ प्रभागातून प्रत्येकी दोन असे एकूण २६ उमेदवार निवडून येणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या