23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeपरभणीकौसडीत नाल्या तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर

कौसडीत नाल्या तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर

एकमत ऑनलाईन

कौसडी/प्रतिनिधी
काही दिवसांपुर्वी ग्रामपंचायतकडून नाल्यातील घान पाणी पुर्णपणे न काढण्यात आल्याने सांडपाणी रस्त्यावर येत असून येणा-या, जाणा-यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच या घान पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असून परीसरातील नागरीकांना नाहक त्रासास सामोरे जावे लागत आहे. या घान पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भिती व्यक्त केली जात असून तुंबलेल्या नाल्यांची पूर्णत: स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी नागरीकातून जोर धरीत आहे.

गावातील नागरिकांनी वेळोवेळी नाल्या उपासण्याकरिता निवेदन दिले. परंतु ग्रामपंचायतकडून नालीतील कचरा न काढता केवळ पाणी काढून दिले जाते. त्यामुळे नाल्यांमध्ये गाळ तसाच राहून नाल्या तुंबून घान पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे या भागातून भीमनगर, धनगर गल्ली व बहिरट गल्ली जोडणा-या रस्त्यावर घान पाणी साचत आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास खुप त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत शिपाईने नाल्यातील घान पाणी अर्धवट काढून दिल्याने आता चिखल जमा होत असून आजूबाजूच्या घरांना दुर्गंधी पसरत आहे.

गावात कधी मधी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असते. दुसरीकडे मात्र रस्त्यावर व नाल्यातील साचलेले घान पाण्याचा निचरा करण्याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्यामुळे गावातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सद्यस्थितीत सदरील नाली फुटल्याने नालीतील घान सांडपाणी रस्त्यावर येऊन साचत असल्यामुळे पादचा-यांसह वाहन चालकांना या रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या साचलेल्या घान पाण्यावर डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांना मलेरिया, थंडी हिवताप, डेंगू यासारखे साथीचे आजार उद्भवू शकतात अशी भिती व्यक्त होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतने याकडे लक्ष देऊन तुंबलेल्या नाली साफ करून सांड पाण्याची योग्य विल्हेवाट लावावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

दुषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भिती
पावसाळ्यात सर्वाधीक प्रमाणात ठिकठिकाणी साचणा-या दुषित पाण्यामुळे साथीचे आजार होण्याची संभावना असते. दुषित पाण्यामुळे डायरिया, कॉलरा, वाताचे विकार, सर्दी, खोकला- पडसे, कावीळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस यांसारखेही विकार जडतात. त्यामुळे गावातील साचलेल्या पाण्याकडे ग्रामपंचायतने लक्ष देणे गरजेचे बनले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या