29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeपरभणीपुर्णेत शिवसैनिकांनी कृषी मंत्र्यांचा ताफा अडवला

पुर्णेत शिवसैनिकांनी कृषी मंत्र्यांचा ताफा अडवला

एकमत ऑनलाईन

परभणी : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे पुर्णेतील मेळाव्यासाठी जात असतांना रस्त्यातच ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करीत त्यांचा ताफा अडविला़ दरम्यान शेतक-यांच्या विविध प्रश्नांसदर्भात कृषी मंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

खरिप पिकांचे झालेले नुकसान व जिल्ह्याचा अतिवृष्टीग्रस्त यादीत समावेश न झाल्याने आक्रमक झालेल्या शेतकरी व शिवसैनिकांनी कृषी मंत्री येणा-या मार्गावर शक्तीप्रदर्शन करीत जोरदार घोषणाबाजी केली़ कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना आपला ताफा थांबवत शेतकरी व शिवसैनिकांकडून निवेदन स्विकारले़ राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे पुर्णेत आयोजीत हिंदू गर्व गर्जना कार्यकर्त्या मेळाव्यासाठी आले होते़ यावेळी झिरो फाटा रस्त्यावर शेतकरी व ठाकरे गटाचे शिवसैनिकांनी कृषी मंत्र्यांचा ताफा अडविला.

दरम्यान पोलिसांनी वेळीच दक्षता घेवून शिवसैनिकांना रोखले त्यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़ यावेळी ५० खोके एकदम ओके, गद्दारांचे करायचं काय, तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशा घोषणा दिल्या़ दरम्यान यावेळी कृषी मंत्र्यांना आपला ताफा थांबवत निवेदन स्विकारले़ यावेळी जिल्हा प्रमुख विशाल कदम, उपजिल्हा प्रमुख दशरथ भोसले, तालुका प्रमुख काशिनाथ काळबांडे, शहर प्रमुख मुंजाभाऊ कदम, संतोष एकलारे, शाम कदम, अ‍ॅड़ राजेश भालेराव आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या