26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeपरभणीपरभणीतील शिवसेना पदाधिकारी शिंदे गटात दाखल

परभणीतील शिवसेना पदाधिकारी शिंदे गटात दाखल

एकमत ऑनलाईन

परभणी : येथील शिवसेनेचे विधानसभा तथा उपजिल्हा प्रमुख माणिक पोंढे यांनी शनिवार, दि़. ३० जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतलेल्या धाडशी निर्णयाने आपण प्रभावीत झालो असून त्यांच्या समर्थनार्थ व हिंदुत्वासाठी समर्पीत भावनेने काम करण्यासाठी प्रवेश केला असल्याचे पोंढे यांनी म्हटले आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या प्रस्थापितांच्या विरोधात आंदोलने करीत अनेक केसेस अंगावर घेतल्या. परंतू दुर्देवाने त्याच काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत काम करण्याची वेळ येवून ठेपली. ती गोष्ट जिव्हारी लागल्याची खंत व्यक्त करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती कोंडी फोडून घेतलेल्या धाडशी निर्णयाने आपण प्रभावीत पोंढे यांनी शिंदे गटात प्रवेश केला असल्याचे म्हटले आहे.

अनेक वर्षांपासून या राज्यातील शिवसैनिक हा अस्वस्थतपणे जगत होता. प्रत्येकाच्या मनात एक अस्वस्थता होती. तीच अस्वस्थता ओळखून आपण शिवसैनिकांचे तारणहार बनला आहात, असे मत व्यक्त करीत पोंढे यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या पत्राद्वारे आपले मत व्यक्त केले आहे.

त्यांच्याच या भूमिकेचे समर्थन करण्यासाठी आपण शिंदे गटात दाखल झालो आहोत. शिवसेनाप्रमुखांनी स्थापन केलेल्या शिवसेना-भाजप युतीचे सरकार आपण पुन्हा सत्तारुढ केल्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार, असेही पोंढे यांनी या पत्रातून म्हटले आहे़

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या