परभणी : राज्यात शिवसेनेत सुरू असलेल्या सत्ता संघर्षात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना भेटण्यासाठी खा़संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी बुधवार, दि़ १३ जुलै रोजी विमानाने मुंबईला रवाना झाले आहेत.
परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो़ राज्यात सध्या शिवसेनेत दोन गट निर्माण झाले असले तरी परभणी जिल्ह्यात मात्र अद्यापही सर्वच शिवसेना ही पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाम राहीली आहे.
परभणीच्या बालेकिल्लात कुठलाही सुरूंग लागला नसल्याने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही खा. संजय जाधव व आ. डॉ. राहूल पाटील यांचे कौतूक केले आहे. दरम्यान खा़संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, विधानसभा अध्यक्ष यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या भेटीसाठी खास विमानाने बुधवारी सायंकाळी रवाना झाले आहेत. हे पदाधिकारी आज रात्री किंवा उद्या सकाळी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेवून आम्ही तुमच्या सोबत असल्याचे दाखवून देणार आहेत.