18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeपरभणीलस न घेतलेल्या दुकानदारांवर होणार दंडात्मक कारवाई

लस न घेतलेल्या दुकानदारांवर होणार दंडात्मक कारवाई

एकमत ऑनलाईन

जिंतूर : कोरोना तिस-या लाटेची शक्यता वर्तवली जात असून भविष्यातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी बुधवार, दि.१३ रोजी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी येथील बाजारपेठेत व्यापारी, नागरिकांना लसीकरणाविषयी जनजागृती केली. शहरातील विविध भागात फिरून व्यापा-यांसह, नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. मात्र बाजरपेठेत अचानक जिल्हाधिकारी आल्याचे कळताच व्यापा-यांची मात्र चांगलीच धावपळ झाल्याचे दिसून आले. यावेळी लसीकरण न केलेल्या दुकानदारांवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

कवच कुंडल अभियानांतर्गत जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी स्वत: जिल्हाधिकारी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन अधिका-यांसह नागरिकांत जनजागृती करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिंतूर शहरातील छ.शिवाजी महाराज चौक, येलदरी रोड, भाजी मंडई, बसस्थानक परिसर, मुख्य बाजारपेठेत प्रत्यक्ष फिरून नागरीक व व्यापा-यांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. काही व्यापारी नागरिकांनी लसीकरण केले नसल्याचे आढळून आले. त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. काही व्यापा-यांनी दुकान बंद करून पळ काढला. यावेळी तहसीलदार सखाराम मांडवगडे, नायब तहसीलदार, परेश चौधरी, मुख्याधिकारी संतोष लोमटे, नगराध्यक्षा सबिया बेगम कफील फारुकी, पोलीस निरीक्षक दीपक, तहसील कार्यालयातील कर्मचारी, नगरसेवक संजय (बंटी) निकाळजे, दलमीर खान, शेख शोएब जानीमियॉ, नगरपरिषद कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

शहरातील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे
जिंतूर शहरातील सर्व नागरिक, व्यापा-यांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे. जिल्हाधिकारी श्रीमती आंचल सुद गोयल यांना नागरिकांच्या आरोग्याची काळजी असल्याने त्या स्वत: येऊन आवाहन करत आहेत. शहरातील सुजान महिला, पुरुषांनी भविष्यातील तिस-या लाटेचे संकेत असल्याने कोरोना लसीकरण करावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सबिया कफिल फारुकी यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या