18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeपरभणीहिंदू धर्म रक्षणासाठी निघाला मुक मोर्चा

हिंदू धर्म रक्षणासाठी निघाला मुक मोर्चा

एकमत ऑनलाईन

परभणी : लव जिहाद आणि धर्मांतरण विरोधी कायदा संपूर्ण देशात लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवार, दिÞ २० नोव्हेंबर रोजी ंिहदू धर्म रक्षण मुक मोर्चा काढण्यात आलाÞ शहरातील शनिवार बाजार येथून निघालेल्या या मोर्चात हजारो ंिहदु समाज बांधव सहभागी झाले होतेÞ

परभणी शहरातील शनिवार बाजार मैदान येथून सकाळी ११ वाजता या मोर्चाला सुरूवात झालीÞ शहरातील शिवाजी चौक, स्टेशन रोड मार्गाने हा मोर्चा शहरातील छÞशिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळील मैदानात पोहचलाÞ या वेळी मोर्चाचे रूपांतर सभेत झालेÞ यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधलेÞ यानंतर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास अभिवादन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आलेÞ या निवेदनात देशात सुरू असलेल्या बेकायदेशीर धर्मांतरण तसेच लव्ह जिहाद सारख्या षडयंत्रांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा बनवण्याची मागणी करण्यात आली आहेÞ

दोषी आढळणा-यावर कठोर कार्यवाही करून हे प्रकरण चालवण्यासाठी विशेष न्यायालयाची नियुक्ती करावी असे या निवेदनात म्हटले आहेÞ तसेच प्रलोभने, धमकावणे, फसवणूक करून असलेले धर्मांतरण रोखण्यासाठी अशा प्रवृत्तींवर कायद्याने बंदी आणण्यात यावीÞ देशात गोवंश हत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात यावाÞ दिल्ली येथील श्रध्दाच्या हत्येचा खटला जलद गती न्यायालयात चालवून दोषी अफताबला फाशिची शिक्षा देण्यात यावी आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाÞ शहरातून काढण्यात आलेल्या या ंिहदू धर्म रक्षण मुक मोर्चात लोकप्रतिनिधी, महाराज मंडळीसह पुरूष व महिला, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होतेÞ

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या