21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeपरभणीस्वच्छतागृहासाठी ठिय्या आंदोलन

स्वच्छतागृहासाठी ठिय्या आंदोलन

एकमत ऑनलाईन

परभणी : शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये महिलांसाठी स्वछता गृह उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सोमवारी, दि.२६ राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून मनपासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाद्वारे शहरातील शिवाजी चौक, गुजरी बाजार, जनता मार्केट, सुभाषरोड, नेहरू पार्क, गांधीपार्क या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र शौचालय नसल्याचे सांगण्यात आले. स्वछतागृह नसल्यामुळे बाजापेठेत दुकानावर काम करणा-या महिला व खरेदीसाठी येणा-या महिलांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत.

वारंवार निवेदन देऊन सुद्धा मनपाकडून याची दखल घेतल्या जात नसल्याने आज ठिय्या आंदोलन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आंदोलनात सहभागी झालेल्या संतप्त महिलांनी मनपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत ठिय्या दिला होता.

या आंदोलनात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आघाडीच्या शहर जिल्हा कार्याध्यक्षा संगीता कडेकर, नंदाताई राठोड, वैशाली गाडगीळे, वंदना जोंधळे, शोभा बनसोडे, सुजाता काळे, अरुणा वैद्य, आशा सावंत, लक्ष्मी शिरसे आदिसह पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत.

निष्काळजीने कोरोनाच्या तिस-या लाटेची शक्यता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या