Tuesday, October 3, 2023

जिल्ह्यात आतापर्यंत १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

परभणी : जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील वालूर येथील एका ५० वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा गुरुवारी उपचारादरम्यान येथील रुग्णालयात मृत्यू झाला आहे. परभणी येथील प्रभावती नगर भागातील ७० वर्षीय महिला २२ जुलै रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास कोरोनाची लागण झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती.

२३ जुलै रोजी सकाळी ६़१५ वाजता या महिलेचा मृत्यू झाला़ त्यानंतर दुपारी सेलू तालुक्यातील वालूर येथील ५० वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा मृत्यू झाला़ या व्यक्तीला १२ जुलै रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ बुधवारीही जिल्ह्यात २ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. जिल्ह्यात आतापर्यंत १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे़ जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५८ झाली आहे. त्यातील २१० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

गंगाखेड येथील रेशन दुकानदाराचा औरंगाबाद येथे मृत्यू
निमोनिया आजारासह कोरोना अहवाल पाँझिटिव्ह आल्याने औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात उपचार दरम्यान शहरातील रेशन दुकानदाराचा मृत्यू झाल्याने शहरात एकच खळबळ निर्माण झाली आसून दो हंसो का जोडा बिछड गया रे म्हणण्याची वेळ आली आहे.

शहरातील रेशन दुकानदार अचानक निमोनियाने आजारी झाल्याने त्यास परभणी येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते पण निमोनिया आजार कमी होत नव्हता अखेर कुंटुबियांनी त्यास औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले आसता या रूग्णालयाने त्याची करोना टेस्ट करण्यात आली आसता पाँझिटिव्ह आल्याने त्याचावर उपचार सुरू केले होते पण रेशन दुकानदार यांचा उपचार दरम्यान प्रकृती मध्ये सुधारणा होत नव्हती.

अखेर आज त्यांचा मृत्यूची वार्ता शहरात आल्याने अनेकांना धक्काच बसला तर अनेक रेशन दुकादार यांनी स्वागत सभारंभातील स्नेह भोजनाने घात काढल्याची चर्चा होत होती शांत स्वभाव आसलेल्या मयत रेशन दुकानदार यांचा भावाचे पण रेशन दुकान आसून दोघाचे दुकान समोरासमोर आसून सर्व लाभार्थी यांना धान्य वाटपा नंतरही एकमेव सुरू आसणारे रेशन दुकानात यांची गणना होते तर एकाच दुचाकीवर सातत्याने फिरणारे कोणत्याही कार्यक्रमास एकञ जाणारे बाजारातही एकञ दिसणारे आसल्याने शहरात त्यांना दो हंसो का जोडा नावाने ओळखत आसल्याने आज एकाचा करोना मुळे मृत्यू झाल्याने दो हंसो का जोडा बिछड गया रे म्हणण्याची वेळ आली आहे.

Read More  सत्तूरनं केले 16 वार : महालक्ष्मी मंदिरासमोरच हत्येचा थरार!

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या