27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeपरभणीकथेत सामाजिक वास्तव प्रतिबिंबित होत असते : मोनिका गजेंद्रगडकर

कथेत सामाजिक वास्तव प्रतिबिंबित होत असते : मोनिका गजेंद्रगडकर

एकमत ऑनलाईन

परभणी : लेखक कितीही म्हणत असला कि माझी कथा ही संपुर्ण कल्पनेतील कथा आहे.तरी सुध्दा त्या कथेचा समाजातील वास्तवाशी जवळचा संबध असतो.लेखक संवेदनशीलतेमुळे लिहीता होतो. त्याच्या लेखनात सामाजीक वास्तव प्रतीबिंबीत होत असते. असे प्रतिपादन मौज प्रकाश गृहाच्या मुख्य संपादक मोनीका गजेंद्रगडकर यांनी रविवार १९ रोजी येथे दिलेल्या व्याख्यानात केले.

येथील गणेश वाचनालयांच्या वतीने प्रतीवर्षी कवी कालीदास दिन साजरा केला जातो. त्या निमित्याने रविवारी व्याख्यात्या मोनीका गजेंद्रगडकर यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. याप्रसंगी सुप्रसिध्द कवी इंद्रजित भालेराव यांची प्रमुख उपस्थीती होती. या वेळी कथे माघच्या कथा या विषयावर गजेंद्रगडकर यांनी आपले विचार मांडले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या प्रत्येक कवी,लेखक उमेदीच्या काळात संर्घष करत असतो त्यांच्यावर पुर्व सुरींचा प्रभाव असतो त्यामुळे तो त्यांचे अनुकरण करत असतो. माझ्या पुरते मी कमी लिहीन,पण चागंले लिहिन असे धोरण मी अवलंबीले श्री.पु. भागवत यांच्या संपादन दृष्टी मुळे माझ्यातला लेखक जिवत झाला.

कथेमाघची खरी कथा ही त्या कथेच्या निर्मिती पर्यंतचा प्रवास आसतो. शब्दावरुन किंवा छटे वरुन सुध्दा कथा हातात येवू शकते असे गजेंद्रगडकर यांनी सांगीतले.
या प्रसंगी कवी भालेराव यांनी संस्कृत भाषेतील महाकवी कालीदास यांच्या साहित्यावर प्रकाश टाकला. मराठीत कालीदासाचा प्रभाव असणारे व त्यास मानणारे रसीक संख्येने खुप आहेत. असे सागुन भालेराव यांनी कवी कालीदासाच्या मेघदुत या काव्याची महती सांगीतली.

प्रारंभी कवी कालीदासाच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुत्रसंचलन व आभार अर्चना संबरकर यांनी मानले. या कार्यक्रमास परभणीतील साहित्य रसीक मोठया संख्येने उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या