परभणी : परभणी ते औरंगाबाद रेल्वे मार्गावरील सारवाडी-कोडी दरम्यान दि़ २१ जुलै ते २३ ऑगस्ट दरम्यान तीन तासांचा ट्राफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही रेल्वे गाड्यांवर परिणाम होणार आहे.
गाडी संख्या १७६८८ धमार्बाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस दि़२२ जुलै ते २४ ऑगस्ट दरम्यान दर बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी धमार्बाद येथून ६० मिनिटे उशिरा सुटेल. गाडी संख्या १७६१७ सी.एस.टी. मुंबई -नांदेड तपोवन एक्स्प्रेस दि़२१ जुलै ते २३ ऑगस्ट दरम्यान दर मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी मनमाड ते जालना दरम्यान ९० मिनिटे उशिरा धावेल.
गाडी संख्या १२७८८ आणि १७२३२ नगरसोल ते नरसापूर एक्स्प्रेस दि़ २१ जुलै ते २३ ऑगस्ट दरम्यान दर मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी नगरसोल ते जालना दरम्यान २० मिनिटे उशिरा धावेल.