परभणी : शहरातील भारतीय बाल विद्यामंदीर येथे ५०वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दि.२६ डिसेंबर रोजी आयोजीत करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात परभणीच्या श्री सारंग स्वामी विद्यालयातील माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या इलेक्ट्रीकल बायसिकलने प्रथम क्रमांक पटकावला़ तसेच प्राथमिक गटातील विद्यार्थ्यांच्या प्रयोगाने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
सदरील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमीक गटात विद्यालयातील इयत्ता १०वी मधील विद्यार्थी युवराज आनंदराव पाटील याने ईलेक्ट्रीक बायसिकल हा प्रयोग सादर केला आहे. ही ईलेक्ट्रीक बायसिकल एकदा चार्जिंग केली असता ती साधारणपणे ६० कि.मी. प्रवास करता येतो. यासाठी त्याने बायसिकलच्या पाठीमागे विविष्ट पद्धतीने १५ एम्पियरची बॅटरी बसवली आहे. अतिशय माफक खर्चात तयार केलेल्या ईलेक्ट्रीक बायसिकलने वेळ श्रम व इंधन बचत करता येईल. त्याच्या या प्रयोगास तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळाला.
तसेच प्राथमीक गटात विद्यालयातील इयत्ता ७वी मधील विद्यार्थी श्रीनिवास देवतवाल आणि तन्मय बाजगीर यांनी ऑटोमॅटीक स्ट्रीट लाईट हा प्रयोग सादर केला. यात त्यांनी दिवसा रोडवरील लाईट हे सूर्यप्रकाश पडला की अपोआप बंद व्हावेत यासाठी एलडीआर ही यंत्रणा वापरून आपला प्रयोग सादर केला. ज्यातून वीज बचत होईल हे त्यांचे उद्दिष्ट आहे. या प्रयोगासही तालुका स्तरावर तृतीय क्रमांक मिळाला. तर या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रयोगांची निवड ही आता जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात झाली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना एम.धुत्तरगावकर, एम.मठपती, एस.कल्याणे, आर.लासे आदी विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. विज्ञान प्रदर्शनात यश मिळालेल्या आणि सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष अशोकराव सावरगावकर, सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक एल.ए. क्षीरसागर, पर्यवेक्षक एस.बी. खांडविकर, संजय पेडगावकर, एस. कीर्तनकार, एन.एस.वांगकर, एस.देशमुख, के.एस. कवडी, एस.पत्रिके, बी.भिसे, एस.पेंडलवार, एन. निलंगे, एम.नरवाडे, एस.गिराम, सी.यादव, एन.गौरशेटे, यु.सोनटक्के, एस.चव्हाण, एन.खाकरे, डी.चव्हाण, ए.फुलारी, के.शिंदे, जे.मुंढे, व्ही.आष्टीकर आदी शिक्षवृंद यांनी अभिनंदन केले आहे.