22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeपरभणीपैशाच्या वादातून चाकूने भोसकून खून

पैशाच्या वादातून चाकूने भोसकून खून

एकमत ऑनलाईन

परभणी : शहरातील खंडोबा बाजार रोडवरील मराठवाडा शाळे समोरील देशमुख हॉटेलजवळ शनिवार दि. ३० जुलै रोजी रात्री उशिरा पैशाच्या वादातून रफिक शेख चाँद शेख उर्फ बाबा यांचा खून झाल्याची घटना घडली. या प्रकरणी दोन आरोपींवर नानलपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीस ताब्यात घेऊन नानलपेठ पोलिस ठाण्यात हजर केले आहे.

या प्रकरणी रहीम खान पठाण यांनी दिलेल्या तक्रार म्हटले आहे की शनिवारी रात्री ते आपल्या मित्रासोबत जात असताना देशमुख हॉटेलजवळील फेरोज खान यांच्या घरासमोर रफिक शेख चाँद शेख उर्फ बाबा हे त्यांचा मित्र शेख सिकंदर याच्यासोबत उभे होते. या ठिकाणी फेरोज खान अब्दुल खान, शेख शाहरूख शेख रशीद उर्फ एसआरके यांचा रफि शेख याच्या सोबत पैशाच्या देवान घेवानीतून वाद होत होता.

यावेळी रफिकने आता आपल्याजवळ पैसे नाहीत उद्या देतो असी फेरोजला सांगितले. यानंतर फेरोजने रागात रफिकच्या पोटावर चाकुने वार केले. तसेच शाहरूखने रफिकच्या पायावर वार केले फिर्यादी रफिकला वाचविण्यासाठी पुढे गेले असता हल्लेखोरांनी पळ काढला. त्यानंतर जखमी रफिकला उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा मृत्य झाला.

या प्रकरणी रहीम खान पठाण यांच्या फिर्यादीवरून रविवार दि. ३१ जुलै रोजी फेरोज खान अब्दूल खान, शेख शाहरूख शेख रशीद उर्फ एसआरके यांच्यावर नानलपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून यातील एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सपोनि. राजकुमार पुजारी करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या