27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeपरभणीश्रमदानातून रायपुरच्या बारवेतील गाळ काढण्यास प्रारंभ

श्रमदानातून रायपुरच्या बारवेतील गाळ काढण्यास प्रारंभ

एकमत ऑनलाईन

सेलू : परभणी जिल्ह्यात बारव स्वच्छता मोहिमेने जोर पकडला असून सेलू तालुक्यातील रायपूर येथे श्रमदानातून बारवेतील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ सेलू उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांच्या हस्ते शनिवार, दिÞ२८ मे रोजी करण्यात आला.
उपविभागीय अधिकारी सौÞसंगेवार शनिवारी सकाळी ८वा. रायपूर येथे पोहचल्या. औपचारिक कार्यक्रमाला फाटा देत त्यांनी ग्रामस्थांना श्रमदानाचे आवाहन केले व स्वत: श्रमदान केले.

सकाळी १० वाजेपर्यत बारवेची साफसफाई व गाळ काढण्यासाठी ६० ग्रामस्थ या मोहिमेत सहभागी झाले होतेÞ श्रमदानानंतर शेजारच्या शेतात नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती. सौ.संगेवार यांनी शेतात ग्रामस्थां समवेत बसून गुळ, ओल्या भाजलेल्या शेंगांचा आस्वाद घेतला. गावच्या महिला सरपंच शांताबाई ंिहगे यांच्या हस्ते सौÞसंगेवार यांचा सत्कार करण्यात आला. बारवेतील गाळ काढण्यासाठी सुरू झालेल्या श्रमदानात दादासाहेब गाडेकर, लक्ष्मणराव गाडेकर, जिजाबाई ंिहगे, पांडूरंग ंिहगे, वैभव गाडेकर, माणिकराव काजळे, राजेंद्र गाडेकर, शाम गाडेकर, सचिन गाडेकर, पांडुरंग सोळंके, अप्पासाहेब गाडेकर, अशोक गायकवाड, अमोल गाडेकर, राजाभाऊ गाडेकर आदींनी सहकार्य केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या