24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeपरभणीमानवत तालुक्यात बोगस औषधीचा साठा पकडला

मानवत तालुक्यात बोगस औषधीचा साठा पकडला

एकमत ऑनलाईन

आंतरराज्यीय टोळी सक्रीय
परभणी : मानवत पोलिसांनी मोठी कारवाई करत उटी येथे लाखो रुपयांचे बोगस औषध पकडल्याने खळबळ उडाली आहे. बोगस औषध प्रकरणात पोलिस कोठडीत असलेल्या आरोपीने चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीवरून मानवत पोलिसांच्या पथकाने मेहकर तालुक्यातील उटी येथे कारवाई करत बोगस औषधाचे ४७ बॉक्स जप्त करीत २७ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. आणखी मुद्देमाल हाती लागण्याची शक्यता आहे. बोगस औषध प्रकरणात आंतरराज्यीय टोळी सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

एका चारचाकी वाहनातून बायो आर ३०३ हे बनावट औषध विक्री करण्यासाठी जात असताना शेतक-यांनी पकडले होते. या प्रकरणी सतीश तरोडकर, दत्ता शिंदे, मुकेश राठी, श्रीराम गिरी आणि मेहकर येथून एका कृषी केंद्र चालकाला ताब्यात घेण्यात आले. पकडलेल्या आरोपीमधील किशोर आंधळे नावाचा आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहे. चौकशीदरम्यान त्याने बोगस औषधीच्या साठ्याविषयी माहिती दिली.

या माहितीवरून मानवत पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक ताठे व कर्मचारी यांचे पथक मेहकर तालुक्यातील उटी येथे पोहोचले. या प्रकरणी आरोपीच्या घरासमोर असलेल्या जुन्या घरात बोगस औषधीचे २७ लाख ६८ हजार रुपये किमतीचे ४७ बॉक्स मिळून आले. मानवत पोलिसांनी सदर मुद्देमाल ताब्यात घेत मानवत पोलिस ठाण्यात आणला. बोगस औषधी प्रकरणात आंतरराज्यीय टोळी सक्रीय असून आणखी मुद्देमाल हाती लागण्याची शक्यता आहे. पोलिस त्या दृष्टीने तपास करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या