24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeपरभणीशुल्क माफीसाठी जोरदार निदर्शने

शुल्क माफीसाठी जोरदार निदर्शने

एकमत ऑनलाईन

परभणी : शासन निर्णयाद्वारे स्थापित शुल्कमाफी समितीची परभणीत तात्काळ सुनावणी करून पारंपारिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना लॉकडाऊन काळातील १०० टक्के शुल्क माफी मिळवून देण्याच्या मागणीसाठी एआयएसएफ संघटनेने बुधवारी, दि.२७ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.

लॉकडाऊनमुळे २४ मार्च २०२० पासून आजतागायत कोणत्याही महाविद्यालयाच्या आवारात अभ्यासवर्ग भरले नाहीत. प्रक्टिकल, लायब्ररी वसतिगृह या कोणत्याही सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळालेला नाही. ऑनलाईन अभ्यासक्रम चालविण्यात आले. ज्यावर शुल्कच्या तुलनेत अत्यंत नगण्य खर्च लागला आहे असे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.

विद्यार्थी संघटनेने सातत्याने शुल्कमाफीसाठी आंदोलन केल्यामुळे लॉकडाऊन काळातील शुल्क माफ करण्याची शिफारस करण्यासाठी शासनाने रीतसर ४ सदस्यीय शुल्कमाफी समिती १५ जुलै २१ रोजी नेमली आहे. तथापि समितीने गेल्या १३ दिवसात एक सुद्धा बैठक घेतली नाही. विद्यार्थी व पालक यांचे म्हणणे ऐकण्यासाठी सुनावणी प्रक्रिया सुरु केली नाही. महाविद्यालयाचे लॉकडाऊन काळातील शुल्क वसुली व खर्च याचे ऑडीट करण्याची पद्धती देखील निश्चित केली नाही. शुल्कमाफी समिती केवळ वेळकाढूपणा करून विद्यार्थी व पालक यांची फसवणूक करीत असल्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यात तीव्र असंतोष निर्माण झाल्याचे निवेदनात नमुद केले आहे.

विद्यापीठाच्या सिनेटच्या तातडीने बैठका घेवून १०० टक्के शुल्कमाफीचा प्रस्ताव सदर समिती आणि शासनाकडे पाठविण्यात यावा अशी मागणी संघटनेचे प्रसाद गोरे, अशोक गोळेगावकर, नरसिंह गोरे, गणेश सोळुंके, रामेश्वर हिंगे, आदित्य गायकवाड, शेख सोहेल, प्रियांका गोरे, अरुण हरकळ, संदीप सोळुंके आदींनी केली आहे.

लोकशाही भारत-अमेरिका नात्याचा आधार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या