22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeपरभणीपरभणीत शिवसेनेकडुन जोरदार निदर्शने

परभणीत शिवसेनेकडुन जोरदार निदर्शने

एकमत ऑनलाईन

परभणी : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवणाऱ्या बंडखोरांच्या निषेधार्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या संतप्त पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.

यावेळी दोन गाढवांवर बंडखोर नेते एकनाथ शिंदे व बंडखोरमंत्री गुलाबराव पाटील या दोघांच्या प्रतिमा लटकवल्या. या प्रतिमांना चप्पलाचे हार घालून दोन्हही गाढवं चौकातून मिरवली. त्या पाठोपाठ बंडखोरांचे प्रतिकात्मक पुतळे आणून त्या पुतळ्याचे दहन करीत जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला.

यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डाँ. विवेक नावंदर, नगरसेवक अतुल सरोदे, बाजार समिती संचालक गंगाप्रसाद आनेराव, युवा सेना जिल्हा प्रमुख अर्जून सामाले, प्रा. पंढरीनाथ धोंडगे, माणिकराव पौंढे, संजय सारणीकर, प्रशांस ठाकूर, चंदू शिंदे, रवी पतंगे, शेख शब्बीर, रावसाहेब रेंगे, अरविंद देशमुख, विजय ठाकूर ,पंढरीनाथ घुले, माणिकराव आव्हाड, काशिनाथ पांढरे, काशिनाथ काळबांडे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या