24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeपरभणीबिल्कीस बानो प्रकरणी जोरदार निदर्शने

बिल्कीस बानो प्रकरणी जोरदार निदर्शने

एकमत ऑनलाईन

परभणी : गुजरात मधील बिलकीस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेप भोगणा-या आरोपींची सुटका झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या वतीने शनिवार दि. २७ ऑगस्ट रोजी जोरदार निदर्शने करण्यात आली.

यावेळी खासदार श्रीमती फौजिया खान, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस ऍड. विजयराव गव्हाणे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवनराव वाघमारे, महानगर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार यांच्या नेतृत्वाखालील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करीत गुजरात व केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला

यावेळी एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या निवेदनातून केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा व मोकाट फिरणा-या आरोपींना पुन्हा गजाआड करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. २००२ साली झालेल्या या प्रकरणाने मानवतेला काळीमा फासला आहे, असे नमूद करीत प्रदीर्घ न्यायालयीन लढाई नंतर बिलकीस बानोला न्याय मिळाला होता.

परंतु, आता त्या प्रकरणातील कैद्यांची सुटका झाल्याने या प्रकरणात स्त्री सन्मानाचा विषय उभा राहीला आहे असे शिष्टमंडळाने या निवेदनातून नमूद केले. या आंदोलनात बाळासाहेब देशमुख, जाकेर खान, सौ. नंदा राठोड, सौ. भावना नखाते, प्रेक्षा भांबळे, शंकर भागवत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, विशाल बुधवंत यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.

मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेचा पाठिंबा
परभणी येथे शनिवारी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटनेच्या वतीने गुजरात सरकाने बिल्कीस बानो प्रकरणी ११ बलात्का-यांची सुटका केली असून त्यांना पुन्हा गजाआड करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलेÞ या आंदोलनास मायनॉरेटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेने पाठिंबा दिला. या संदर्भात केंद्र सरकाने लक्ष घालावे असे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर संघटनेचे महेबुब खान पठाण सय्यद रफीक पेडगावकर, शेख उस्मान शेख इस्माईल, शेख यामीन पटेल यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या