कौसडी : जिंतूर तालुक्यातील वाघी बोबडे येथील प्रभुकृपा माध्यमिक विद्यालय व योगशिक्षक गजानन चौधरी यांच्या वतीने दि. ७ डिसेंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी योगा, प्राणायाम व आसने यावर मार्गदर्शनपर कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक प्रा. संतोष साखरे होते. पतंजली महिला समितीच्या जिल्हा प्रभारी मंजुषा जामगे, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे योगशिक्षक गजानन चौधरी व रोहिणी शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना शालेय जीवनात महत्त्वाची असलेली प्राणायामाची क्रिया प्राणायाम योगासने यांची प्रात्यक्षिकासह माहिती दिली. याप्रसंगी शाळेचे विद्यार्थी व योगासन स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी यांचा प्राणायामासह शयण स्थिती, विपरीत शयण स्थिती, बैठक स्थिती व दंड स्थितीमधील महत्त्वाच्या क्रियांचा अभ्यास घेण्यात आला.
कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक संतोष साखरे यांच्यासह उद्धव ठोंबरे, धुळे, गजानन पाटील, रुपेश पटवे, प्रसाद साळवे, सरगर, वसमतकर, नवनाथ पांचाळ, संदीप रोहिनकर, शिवदास रोहिणकर यांनी सहभाग घेऊन परिश्रम घेतले.