19.6 C
Latur
Tuesday, February 7, 2023
Homeपरभणीविद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन अंगिकारला पाहिजे : प्राचार्य वटाणे

विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन अंगिकारला पाहिजे : प्राचार्य वटाणे

एकमत ऑनलाईन

जिंतूर : हस्तकला व विज्ञान प्रयोगाचे बाल वयात मोठे महत्व आहे़ या गोष्टींचे महत्व विद्यार्थ्यांनी ओळखले पाहिजे़ विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य बळीराम वटाणे यांनी केले.

येथील जवाहर प्राथमिक विद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.दादारावजी सितारामजी वटाणे पाटील यांच्या १६व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त हस्तकला वस्तू व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य बळीराम वटाणे बोलत होते़ प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील बालरोग तज्ञ डॉ.बाळासाहेब घुगे, पालक प्रतिनिधी सतीशराव आदमाने, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मते उपस्थित होते.

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दादासाहेबांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मते यांनी प्रास्ताविकातून विद्यालयात राबविण्यात येणारे विविध उपक्रम व स्पर्धा विषयी माहिती दिली. यानंतर बोलताना डॉ.घुगे यांनी शालेय जीवनातील विज्ञान प्रयोगाचे महत्त्व सांगितले. यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते रिबीन कापून हस्तकला वस्तूंचे व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यालयातील १८० विद्यार्थ्यांनी आपले प्रयोग दाखवले तर सुंदर हस्तकला वस्तू बनवण्यात १६० विद्यार्थ्यांनी आपल्या वस्तू बनवून आणल्या होत्या. सूत्रसंचालन श्रीमती अलका परणे यांनी तर आभार विष्णू रोकडे यांनी मानले. या कार्यक्रमास शाळेतील सहशिक्षक शिवाजी ठोंबरे, रामकिशन टाके, अमोल राऊत, ज्ञानेश्वर पोटे, पल्लवी तरटे, प्रियंका कापसे, श्रीमती अनुजा कामारीकर हे उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या