22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeपरभणीविद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्य विकसीत करून स्वंयपूर्ण व्हावे : डिसले

विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्य विकसीत करून स्वंयपूर्ण व्हावे : डिसले

एकमत ऑनलाईन

परभणी : आपण पुस्तकातल्या समस्या सोडवतो पण जीवनातल्या समस्या सोडविण्याचे कौशल्य आपणाकडे नसते़ त्यामुळे पुस्तकी ज्ञानावर अवलंबुन न राहता विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि कौशल्य विकसित करुन स्वंयपूर्ण झाले पाहीजे असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक डॉ. रणजीतसिंह डिसले यांनी केले.

शिवसेना परभणी विधानसभेच्या वतीने रविवार, दि़ २४ जुलै रोजी शहरातील अक्षदा मंगल कार्यालय येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन मेळावा पार पडला. यावेळी डिसले बोलत होते. व्यासपिठावर आयोजक आमदार डॉ.राहुल पाटील, जिल्हाधिकारी आंचल गोयल, महिला आघाडी संपर्क प्रमुख ज्योतीताई ठाकरे, शिक्षण तज्ज्ञ रवींद्र बनसोड, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, शिवसेना सहसपंर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, आशा गरुड, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सखुबाई लटपटे, अंबिका डहाळे आदींची यावेळी उपस्थिती होती.

पुढे बोलताना डिसले म्हणाले, जीवनात मार्क आणि मनी या दोन गोष्टींच्या मागे लागू नका कौशल्य विकसित करा. यश मिळाल्यानंतर जीवनात अनेक मार्ग खुले होतात़ त्यातून ज्ञान मिळवा कारण यशापेक्षा ज्ञान महत्त्वाचे असते़ जगात ज्ञान असणा-या लोकांनाच सन्मान मिळत असतो़ सध्याच्या काळात माणसे एकत्र येणे अवघड झाले आहे. परंतु डॉ.राहुल पाटील यांच्यासारखे लोकप्रतिनिधी हजारो माणसाना एकत्र आणण्याचे कार्य करत गुणवंताच्या पाठीवर कौतुकाची थाप मारुन गुणवंताना उभारी देण्याचे काम त्यांच्या हातुन होत असल्याने गुणवंत विद्यार्थी निश्चीत आपले ध्येय साध्य करतील असा विश्वास डिसले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

डॉ.पाटील म्हणाले, दरवर्षी शिवसेनेच्यावतीने गुणवंताचा सत्कार करण्यात येतो. परभणी ही जशी संताची भुमी आहे तशीच ती गुणवंत विद्यार्थ्यांची देखील आहे. परभणीत एक गुणवत्तेचा पॅटर्न तयार होत असून भविष्यात शिक्षण क्षेत्रात जे काही करता येईल त्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे आ़पाटील म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी मार्गदर्शन केले. रवींद्र बनसोड यांनी जीवनातील ध्येय निश्चित करूनच वाटचाल करा़ आई-वडिलांना सर्वश्रेष्ठ तीर्थक्षेत्र माना, त्यांची सेवा करा असे मार्गदर्शन केले. यावेळी ज्योती ठाकरे यांनी देखील मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात ६०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार प्रा. ग़जानन काकडे व प्रल्हाद देवडे यांनी केले.

यशस्वीतेसाठी संजय गाडगे, सदाशिव देशमुख, नंदू पाटील, संदीप झाडे, अनिल डहाळे, रवी पतंगे, दिनेश बोबडे, सोपान अवचार, संग्राम जामकर, अरविंद देशमुख, नवनीत पाचपोर, बाळराजे तळेकर, मारुती तिथे, संभानाथ काळे, ऋषी सावंत, उद्दव मोहिते, बाबू फुलपगार व शिवसेना, युवासेना पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले़

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या