जिंतूर : श्रीहरीकोटा, थूंबा स्पेस म्युझियम, विश्वस्वरैय्या टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे होणा-या शैक्षणिक सहली करिता झालेल्या तालुकास्तरीय प्रवेश परीक्षेमध्ये येसेगाव येथील वर्ग आठवीची विद्यार्थिनी कु.वैष्णवी मुक्तेश्वर शेळके तालुक्यातून प्रथम आली असून मुलांमध्येही येसेगावचाच अनुराग नंदकिशोर ढवळे हा परभणी येथे होणा-या जिल्हास्तरीय प्रवेश परीक्षेसाठी पात्र झाला आहे.
सदरील परीक्षा दि.३ मार्च रोजी जिल्हा परिषद प्रशाला जिंतूर येथे आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेकरता तालुक्यातील प्रत्येक केंद्रातून १० विद्यार्थी परीक्षेकरिता पात्र झाले होते. इयत्ता ५ वी ते ८ वीचा अभ्यासक्रम तसेच २५ गुणांचा विज्ञानातील माहितीवर आधारित निबंध असे या परीक्षेचे स्वरूप होते. सदरील परीक्षेत १७३ विद्यार्थ्यांमधून वैष्णवी शेळके हिने तालुक्यातून प्रथम स्थान पटकावले असून अनुराग ढवळे हा वर्ग ६ वीचा विद्यार्थी देखील परभणी येथे होणा-या जिल्हास्तरीय प्रवेश परीक्षा करिता पात्र झाला आहे.
दोन्ही गुणवंतांचे शाळेचे मुख्याध्यापक एस.बी.चव्हाण, गावच्या सरपंच श्रीमती विमलबाई लकडे, शिक्षण प्रेमी समाजसेवक संदीप लकडे, उपसरपंच शेषेराव शेळके, शाळा व्य.स.अध्यक्ष निवृत्ती कराळे, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, शाळेचे सर्व शिक्षक वृंद झाडे के.बी, भुरके के.पी., गायकवाड डी.आर. देशपांडे पी.पी. गावातील पालक तसेच सर्व नागरिकानी अभिनंदन केले आहे.