18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeपरभणीपरभणीतील गिर्यारोहकांचे सामाजिक एकात्मतेचा संदेश देत उत्तराखंडमध्ये यशस्वी गिर्यारोहण

परभणीतील गिर्यारोहकांचे सामाजिक एकात्मतेचा संदेश देत उत्तराखंडमध्ये यशस्वी गिर्यारोहण

एकमत ऑनलाईन

परभणी : परभणीतून १ नोव्हेंबर रोजी रवाना झालेल्या गिर्यारोहकांनी उत्तराखंडमधील गोमुख-तपोवन व दयारा बुग्याल या दोन मोहिमा सामाजिक एकात्मता, निसर्ग संवर्धन व स्वच्छतेचा संदेश देत यशस्वीपणे सर केल्या.

गंगोत्री ते भोजबासा पायी चालत तिथे उने -२ सेल्शीअस अशा अंग गोठवणा-या तापमानात दोन मुक्काम करत १४६३० फूट उंच असलेल्या गंगानदीचा उगम बघून व गोमुख- तपोवनचे दर्शन करून उपस्थित मंत्रमुग्ध झाले. याठिकाणी सर्वांनी बर्फवृष्टीचाही आनंद घेतला. जिल्हा उत्तरकाशी नजीक ११९४० उंचीवर असलेल्या दयारा बुग्यालची सुंदर वनसंपदा, मनमोहक निसर्ग व शिखरमाथ्यावरून दिसणारी हिमशिखरे बघून सर्वांनी डोळ्याची पारने फिटल्याचा व प्रसन्नतेचा अनुभव घेतला.

परभणी शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असणारे तब्बल ५० कर्तबगार गिर्यारोहणप्रेमींनी भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम, निसर्गसंवर्धन करू, सृष्टी वाचवू, पृथ्वी सुंदर ठेवू, हम सब एक है अशा घोषणा देत मोहीमेचा आनंद घेतला. ॠषिकेश येथील प्रसिद्ध रिवर राफटींग करून ही मोहीम आटोपली. ही मोहीम अस्थिरोग तज्ञ डॉ.केदार खंिटग यांची शिस्त व मार्गदर्शन, दिल्लीचे प्रसिद्ध गिर्यारोहक राहूल शर्मा, परभणीचे गिर्यारोहक रणजित कारेगावकर यांचा पुढाकार व स्वराज ट्रेकर्सचे राजेश्वर गरुड यांचे परीपुर्ण नियोजनाने व्यवस्थित पार पडली.

या मोहीमा डॉ.चंद्रशेखर भालेराव, डॉ.गजानन मार्डिकर, डॉ.संदीप कार्ले, डॉ.शिवराज टेंगसे, डॉ.जगदीश नाईक, विठ्ठल शिसोदिया, ओम तलरेजा, सनत जैन, प्रा.डॉ.जयंत बोबडे, बालाजी सुर्वे, विष्णू मेहञे, अतुल शेळके, डॉ.सचिन देशमुख, रामप्रसाद सोळंके, सचिन माळवदकर, दीपक चव्हाण, सुधीर देशमुख, विकास वाराळ, विलास वाराळ, डॉÞभारत देवसरकर, ज्ञानराज खंिटग, कृष्णा जावळे, डॉ.ज्ञानेश्वर हर्बक, प्रा.रमेश शिंदे, प्रदुम्न शिंदे, प्रा.राम कराळे, सुधीर देशमुख, सोपान पंडीत, राम पवार, प्रल्हाद गरड, श्याम पवार, व्यंकटेश शिंदे, रवींद्र रेड्डी, दीपक नागोरे, कल्याण राठोड, विजय पवार, शिवशंकर मनाळे, बाळासाहेब घाटोळ, चेतन औंढेकर, ऍड.सचीन पन्हाळे, डॉ.श्रीकांत ओव्हर यांच्यासह स्थानिक गाईड दीपक पोवार, प्रदीप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी उत्साहाने पार पाडल्या.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या