सोनपेठ : तालुक्यातील काँग्रेसचे युवा पदाधिकारी सुदर्शन कदम यांनी स्वत:च्या पुढाकारातून तालुक्यातील विविध गावातून स्वखर्चातून २५ वयोवृध्द रुग्णांवर पुणे येथील ससुन रुग्णालयात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नेत्र शस्त्रक्रिया करून घेतली. या उपक्रमांचे रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकातून कौतुक होत आहे.
तालुक्यातील काँग्रेसचे युवा पदाधिकारी कदम यांनी यासाठी पुढाकार घेतला. तालुक्यातील विविध गावातील गरजू रूग्णांची नेत्र शस्त्रक्रियेसाठी निवड केली़ नेत्र शस्त्र क्रियेसाठी निवड झालेल्या २५ रूग्णांवर पुणे येथील ससुन रूग्णालयात स्वखर्चातून शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यापुढेही सामाजिक बांधिलकी जोपासून आपण ग्रामीण भागातील रुग्णांना आधार देणार असल्याचे कदम यांनी सांगितले. गरजू रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन कदम यांनी केले आहे.