22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeपरभणीसुधीर बोर्डे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

सुधीर बोर्डे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

एकमत ऑनलाईन

परभणी : जयहिंद सेवाभावी शिक्षण संस्था परभणीच्या २५व्या वर्धापन दिना निमित्त महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या २५ मान्यवरांचा रविवार दि. २१ ऑगस्ट रोजी ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी येथे महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दैनिक एकमत परभणी कार्यालयातील उपसंपादक सुधीर गोपाळराव बोर्डे यांना उत्कृष्ट पत्रकारितेसाठी बहिण सौ. अश्विनी बोर्डे यांच्यासह महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री अ‍ॅड. गणेशराव दुधगावकर हे होते. माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुरेशराव वरपूडकर यांच्याहस्ते पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर भगवानराव वाघमारे, चित्रपट दिग्दर्शक गफार मास्टर, ज्येष्ठ समाजसेवक जेडी शाह, इमरान राही, ज्येष्ठ पत्रकार हमीद मलीक, सुनिल कुमरे, सिनेअभिनेत्री वंदना गव्हाणे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते कदीर लाला हाश्मी, युवा नेते समीर दुधगावकर उपस्थित होते.

या पुरस्कार सोहळयाचे स्वागताध्यक्ष इंजिनिअर आर.डी.मगर होते. प्रास्ताविक आयोजक अ. सत्तार इनामदार यांनी केले. सुत्रसंचलन प्रा. अरूण पडघण यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल उपसंपादक सुधीर बोर्डे यांचे बहीण, भाऊ, कुटुंबीय व मित्र परीवाराने अभिनंदन केले असून अनेकांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या