32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeपरभणीसंशयीत गुप्तधन टोळीचा जिंतुर शहरात पर्दाफाश

संशयीत गुप्तधन टोळीचा जिंतुर शहरात पर्दाफाश

एकमत ऑनलाईन

जिंतूर : शहरात गुप्तधन काढण्याच्या उद्देशाने आलेल्या टोळीला जिंतूर शहरात रात्री गस्तावर असलेल्या पोलीसांनी वाहन व इतर साहीत्यासह रंगेहाथ पकडले.

शहरात पोलिस ठाण्यातील पोलिस उप-निरीक्षक रवि मुंडे व त्यांचे सहकारी पहाटे चारच्या सुमारास गस्तीवर होते यावेळी एक जीप परभणी कडून बलसा मार्र्गी होत जिंतूरातील शिवाजी चौकात आली पोलिसांना या वाहनातील व्यक्तीचा संशय आल्याने त्यांनी जीपची तपासणी केली असता या जीप मध्ये हळदीकुंकू, गंडादोरा लिंबू मिरच्या, टिकाव, खोरे, टोपले, यासह जादूटोण्याचे साहित्य आढळून आले.

त्यामुळे पोलिसांना सदरील सर्व व्यक्तीची कसून चौकशी सुरू केली असता या संशियत आरोपींनी सांगितले कि जिंतूर शहरातील व्यापारी अब्दुल रज्जाक यांच्या सांगण्यावरून आम्ही आलो असून तालुक्यातील देगाव परिसरात गुप्तधन आहे. मांत्रिक रमेश पुंडलीक जंजाळे राहणार अकोला यांना कळते त्यामुळे आम्ही गुप्त धन काढण्यासाठी आलो आहोत अशी माहिती त्यांनी दिली.

त्यानंतर पोलिसांनी अब्दुल रज्जाक व जफर खान यांना बोलून घेतले त्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलीस कर्मचारी अनिल इंगोले यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी रज्जाक दादाभाई भुरी,जफर बहदुर खान,(रा.जिंतूर अश्विन विजयी नेमाडे, (वाहन चालक) तुषार प्रकाश रोकडे, दीलीप प्रभाकर आढाव, रमेश पुंडलीक जंजाळ, करण कमल सिंग ठाकूर, मोहम्मद इब्राहिम सर्व राहणारे अकोला जफर अली अब्दुल रज्जाक जिंतूर यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात .आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड करत आहे.

माजी आमदार सुधाकरपंत परिचारक अनंतात विलीन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या