26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeपरभणीस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जोडे मारो आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जोडे मारो आंदोलन

एकमत ऑनलाईन

परभणी : कोरोनामुळे शेतमाल विक्री व्यवस्था कोलमडून पडल्यामुळे खत दरवाढ करणार नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते. परंतू इतर राज्यातील निवडणुका संपताच खतांची भरमसाठी दरवाढ करण्यात आल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला असून या निषेधार्थ केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला सोमवारी दि.१७ जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला. तसेच ही दरवाढ मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली

शहरातील छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळली मैदानात हे आंदोलन करण्यात आले. गेल्या कही दिवसांत बिकट परिस्थितीमुळे शेतक-यांनी आत्महत्या केल्या असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याचे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून निषेध व्यक्त केला. यावेळी केंद्र सरकारने खतांची दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी करण्यात आली.

सीबीआय कार्यालयावर तृणमूल कार्यकर्त्यांची दगडफेक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या