पाथरी : आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या वतीने काढण्यात आलेल्या मशाल रॅलीचे येथील स्व़नितीन महाविद्यालयात देशभक्तीपर गगनभेदी घोषणा देत महाविद्यालयातील सर्व स्टाफसह विद्यांर्थ्यांनी गॉड ऑफ ऑनर देत टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात मंगळवार, दि़२४ जानेवारी रोजी जंगी स्वागत केले.
ही मशाल रॅली स्वारातीम नांदेडचे कुलगुरू डॉ़उद्धव भोसले, महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष डॉ़जोगेंद्रसिंह बिसेन, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ़सुर्यप्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी पुर्णा येथून परभणी जिल्ह्यात प्रवेशीत झाली. मंगळवारी सोनपेठ येथून पाथरी येथे सकाळी १० वाजता पोहचल्यानंतर महाविद्यालयाच्या प्रवेशव्दारावर प्राचार्य डॉ. आऱएसफ़ुन्ने, उपप्राचार्य डॉ. सुरेशराव सामाले, सहकारी प्राध्यापक, कर्मचारी यांनी मशालीचे स्वागत करून राष्ट्रभक्तीपर गगनभेदी जयघोष करत देशप्रेमाची भावना जागृत केली.
या वेळी प्रवेशव्दारापासून महाविद्यालयापर्यंत प्राचार्य डॉ. आऱएसफ़ुन्ने यांनी मशाल हाती घेतली. या वेळी रस्त्याच्या दुतर्फा थांबलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भारतमाता की जय, वंदेमातरम जय हिंद आदी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या वेळी मशाल महाविद्यालयात आल्यानंतर प्राचार्य डॉफ़ुन्ने यांनी विद्यापिठ मशाल रॅलीला शुभेच्छा दिल्या. या वेळी मशाल रॅली सोबत असलेल्या स्वयंसेवकांनी हाथ समोर करत शपथ दिली़ या वेळी चित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत जिल्ह्यातील निवडक महाविद्यालयातील १० स्वयंसेवक उपस्थित आहेत.
या वेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी मशाल हाती घेत भारत मातेचा जयघोष केला. या वेळी या मशाल रॅलीच्या उद्देश उपप्राचार्य डॉ़सामाले यांनी विद्यार्थ्यांना सांगितला. या मशाल रॅली सोबत डॉ. जयंत बोबडे, डॉ़प्रल्हाद भोपे, डॉ. दिगंबर रोडे, डॉ. सचिन खडके यांची उपस्थिती होती. या मशाल रॅलीच्या स्वागत समारंभासाठी प्राचार्य डॉ फ़ुन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य डॉ़ सामाले, आयक्यूएसीचे प्रा़डॉ़ भारतराव निर्वळ, प्रा़ डॉ़ साहेब राठोड, प्रा़डॉ़जगन्नाथराव बोचरे, प्रा़ डॉ़ मारोतराव खेडेकर, प्रा़ डॉ़ अंकुश सोळंके, प्रा़ डॉ़ आनंद इंजेगावकर, प्रा़ डॉ़ मधूकर ठोंबरे, प्रा़ डॉ़ आऱ एम़ जाधव, प्रा़ डॉ़ ए़जी़बदने, प्रा़ डॉ़संदिप जाधव, प्रा़ डॉ़ शितल गायकवाड, प्रा़तुशशीदास काळे, प्रा़डॉ़हरी काळे, प्रा़ डॉ़ हनुमान मुसळे, प्रा़ डॉ़ गणपतराव मोरे, प्रा़रणजित गायके, ग्रंथपाल कल्याण यादव, शिक्षकेत्तर कर्मचारी सुनिलराव लहाने, रमेश लिंगायत, चव्हाण, सुमित, माधव नखाते, महेश तौर, किरण घुंबरे, सतिष काळदाते, बलबंते, गिराम आदी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.