झरी : जिंतूर-परभणी रस्त्यावर झरी जवळील खानापूर येथे महिंद्रा मॅक्स, एस प्रेसो व मालवाहू टेम्पो या तीन वाहनांचा भीषण अपघातात एक पोलीस अधिकारी व दोन नागरिक जखमी झाल्याची घटना मंगळवार दि़ ५ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
परभणी येथून महिंद्रा मॅक्स (एमएच २२ डी १८०८) ही गाडी झरीकडे येत होती. याचवेळी एसप्रेसो (एमएच २२ एडब्ल्यू १८६५) व मालवाहू टेम्पो (एमएच २६ डी ७२५३) हे बोरीकडून परभणीकडे जात होते. या दरम्यान झरी जवळील खानापूर या गावाजवळ राज्य मार्गावर या तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात बोरीच्या पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पुरी, वामन श्रीरंग ससे हे दोघे डोक्याला मार लागून जखमी झाले.
त्यांच्यावर परभणीच्या खाजगी रुग्णालयात व जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार चालू आहेत. या घटनेची नोंद परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक समोसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार के.एस.कादरी व डी.डी. डुकरे हे करीत आहेत.