22.1 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeपरभणीपुर्णेतील उड्डान पुला जवळील पर्यायी रस्ता बनला धोकादायक

पुर्णेतील उड्डान पुला जवळील पर्यायी रस्ता बनला धोकादायक

एकमत ऑनलाईन

पूर्णा : शहराजवळील पूर्णा-अकोला, पूर्णा-नांदेड लोहमार्गावर दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या नियंत्रणाखाली शंभर कोटी रुपये खर्चून आंध्र प्रदेशातील ठेकेदारामार्फत उड्डाण पुलाच्या कामासाठी ९ मोठ्या मजबूत पिल्लरचे काम गेल्या दोन वर्षापासून अतिशय संथगतीने सुरू आहे. उभारलेल्या एकूण ९ पिल्लर पैकी काही पिल्लरचे काम निकृष्ट असल्याचे निष्पन्न झाल्याने निकृष्ट पिल्लर पाडून त्या ठिकाणी नवीन पिल्लर तयार करण्याचे आदेश या गुत्तेदारास दिले होतेÞ त्यानुसार पिल्लरचे काम नव्याने सुरू असून वाहतुकीसाठी अडथळा येवू नये म्हणून एकपदरी पर्यायी रस्ता ठेवण्यात आला आहे. परंतू हा रस्ता मजबूत पध्दतीने तयार केला नसल्याने वाहनाधारकांना वाहने नेताना तारेवरची कसरत करावी लागत आहेÞ तसेच धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परीणाम होत आहे.

सदर कामाचे टेंडर घेतलेले गुत्तेदार हे दुस-या राज्यात राहून उंटावरुन शेळया हाकल्याप्रमाणे काही व्यवस्थापक आणि सुपरवायझर यांना कामावर नेमून काम सुरू आहे. पुलाच्या कामासाठी पर्यायी रस्ता सदर गुत्तेदाराने मजबूत काम न केल्याने यावर मोठमोठे खड्डे पडून रस्ता अक्षरश:उखडून गिट्ठी पसरली आहे. त्यामुळे या खराब रस्त्यावरुन दुचाकी, चारचाकी वाहनाची वाहतूक करणे तारेवरची कसरत बनली आहे.

नागरिकांना प्रवास करते वेळेस मोठ्या प्रमाणात धुळीचा सामना करावा लागत आहेÞ सध्या बळीराजा साखर कारखान्याचे गाळप चालू झाल्याने पूर्णा तालूक्यातील ऊस तोडणी होऊन गाळपासाठी साखर कारखान्याकडे वाहतूक करणे चालू झाले आहे. मात्र या रस्त्यावरुन ऊसाची वाहतूक करणे मुश्किल आहेÞ ऊस भरुन जाणारे ट्रॅक्टर, ट्रक वाहने पल्टी होऊन अपघात होण्याची दाट शक्यता आहे. लहान मोठे अपघात होत असूनही गुत्तेदार पर्यायी रस्ता मजबूत करुन देत नसल्याने प्रवाशातून तीव्र संताप व्यक्त होत आहेÞ वरीष्ठ अधिका-यांनी याकडे लक्ष देवून पर्यायी रस्त्याचे चांगल्या दर्जाचे काम तात्काळ करण्यात यावे अशी मागणी नागरिकातून होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या