परभणी/प्रतिनिधी
सेलू तालुक्यातील वालूर येथे १५ मे रोजी सुरु केलेल्या बारव स्वच्छता मोहिमेत तरुणांनी व गावक-यांनी दिवस रात्र श्रमदान केले. श्रमदानाच्या सातव्या दिवशीही या बारवेचे काम सुरुच होते. गावक-यांच्या मेहनतीला अखेर यश आले असून या बारवास पाणी लागले आहे. त्यामुळे गावक-यांसह परीसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी जल पूजन करून नारळ फोडण्यात आले. यावेळेस गावक-यांच्या आनंदास पारावार उरला नाही.
बारव पुनर्जीवित झाल्याने त्या भागातील पाणी प्रश्न देखील मिटेल, अशी अपेक्षा यावेळी ग्रामस्थांनी केली. या बारवेचे पुनर्जीवन करण्यासाठी अमोल मोगरे, मुकुंद मुंढे, लक्ष्मण खरबे, गणेश धापसे, नामदेव राख, पांडुरंग रोकडे, अंकुश राख, संतोष बोडके, ज्ञानेश्वर ढाकणे, गणेश मगर, देशमाने गुरुजी, पांडुरंग खराबे, वाल्मीक दराडे, योगेश मुंडे, विष्णू टेकाळे, सुदाम मुंडे, राजू भाऊ दराडे, नारायण दराडे, भास्कर लांडे, तुकाराम मेफळ, वाल्मीक दराडे, सुदाम रोकडे, बापूराव बगले, वैभव सोनवणे, प्रविण राख, गणेश रोकडे, विनोद रोकडे, मधु टेकाळे, राजूभाऊ डंक, रमेश काका शर्मा, कृष्णा मुंडे, दत्ता देशमाने, वैभव तळेकर, प्रल्हाद दराडे, गणेश अण्णा खरबे, नामदेव बालटकर, तळेकर वाल्मीक, राहुल दराडे, मुक्तीराम सोनवणे, गजानन देशमाने, रामा अबुज, माणिक गिनगिने, दत्ता राख, गोपाळ अबुज, ऋषी मुंडे, भगवान मुंडे, रामभाऊ धापासे, राहुल ढाकणे, विशाल मगर, वाल्मीक गीते, प्रथमेश इलग, तुकाराम इंगोले,
कुलदीप राख, श्रीरंग मुंडे, महादेव मुंडे, नागनाथ दराडे, वाल्मीक मुंडे, विशाल लाड, नामदेव राख, बाबासाहेब राख, आसाराम मुंडे, अनिल टेकाळे, बालाजी बोडके, ज्ञानेश्वर खरबे, रमेश धापसे, सुनील धरपडे, रामभाऊ पाथरकर, गजानन देशमाने, संतोष तळेकर, गजानन देशमाने, सोपान घुगे, काशिनाथ मुंडे, बद्रीनाथ तांबट, नितीन दराडे, नवनाथ दराडे, संतोष दराडे, राहुल बोडके, गणेश दराडे, छडानन मसुरे, गोपाळ थोरात, बबन पालवे, वाल्मीक खिस्ते, तुकाराम खिस्ते, भगवान दराडे, गुलाब मुंडे, शिवाजी दराडे, ज्ञानेश्वर घुगे, गणेश रोकडे, शिवाजी पाठक, धोंडीराम रोकडे, अर्जुन अबुज, प्रतीक नेमाने, ऋषी राख, दशरथ इंगोले, तुकाराम इंगोले, विश्वनाथ धापसे, मधुकर दराडे, विश्वनाथ मुंडे, रावसाहेब दराडे, परमेश्वर राख, विष्णू राख, बाबासाहेब राख, अभय दायमा, विजय मेफल, डॉ.देशमुख भाऊ, गणेश सनई यांच्यासह ग्रामस्थांनी श्रमदान केले. वालूर ग्रामस्थांनी पुरातन बारवेची स्वच्छता मोहीम सुरू करून त्यांच्या परीश्रमाला यश आल्यामुळे गावक-यांत मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.