24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeपरभणीबोरीच्या पक्षी स्थळावर विदेशी पाहुण्यांचे आगमन वाढले

बोरीच्या पक्षी स्थळावर विदेशी पाहुण्यांचे आगमन वाढले

एकमत ऑनलाईन

बोरी/प्रतिनिधी
येथील संजय नगरातील पक्षी स्थळावर गेल्या दोन महिन्यांपासून विदेशी पक्ष्यांचे आगमन होत आहे. या ठिकाणी चितुर पक्षी, बुलबुली, ब्राह्मणी मैना, मी टू असे निरनिराळे पक्षी याठिकाणी येत असल्यामुळे नागरीकांची या पक्षांना पाहण्यासाठी पक्ष्यांची किलबिल या भागात जाणवत आहे. तसेच पक्षांच्या किलबिलाटाने हा परीसर गजबजत आहे.

या ठिकाणी पक्षीमित्र विठ्ठलराव अभुरे यांनी आपल्या परिश्रमातून गेल्या १९ वर्षांपासून पक्ष्यासाठी धान्य व पाण्याची उत्तम सोय केल्यामुळे या ठिकाणी सकाळी व सायंकाळच्या वेळी पक्ष्यांची मोठी गर्दी होत आहे. आपल्या घराच्या छतावर पक्षांनी अनेक घरटे निर्माण केले आहेत. या छतावर पाण्याचा हौद, पक्ष्यांना झाडे लावून बसण्याची व्यवस्था, दररोज धान्य व पाणी व्यवस्था असल्यामुळे या ठिकाणी पक्षी मोठ्या प्रमाणात येतात. जंगलातील पाण्याचे साठे नाहीसे झाल्यामुळे पक्षांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला आहे. या पक्षी स्थळावर निरनिराळे पक्षी सध्या येत असल्यामुळे पक्षी पाहण्यासाठी बालके व इतर नागरिक दररोज आपली हजेरी लावत आहेत. या ठिकाणी चितुर पक्षी, बुलबुली, ब्राह्मणी मैना, मी टू असे निरनिराळे पक्षी याठिकाणी येत असल्यामुळे पक्ष्यांची सकाळी व सायंकाळी किलबिल वाढली आहे.

जखमी पक्ष्यांचे संगोपन
या ठिकाणी सायंकाळच्या वेळी अन्नधान्य टाकण्यासाठी शेतावर गेल्यानंतर अनेक वेळा जखमी अवस्थेत असलेली पक्षी आढळून येतात. या पक्षावर योग्य ते उपचार करून पक्ष्यांना जंगलात सोडण्याचे काम विठ्ठल कांबळे यांच्याकडून करण्यात येत आहे. सेवाभावी संस्थेची स्थापना संजय नगरातील पक्षी स्थळाचा विकास करण्यासाठी विठ्ठल कृपा पक्षी अन्नक्षेत्र बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची स्थापना करून या ठिकाणी स्थळांचा विकास करणार असल्याचे विठ्ठल अभुरे यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या