21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeक्राइमबेपत्ता व्यक्तीचा बोरवंड येथे सापडला मृतदेह, पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी दिली गुन्ह्याची...

बेपत्ता व्यक्तीचा बोरवंड येथे सापडला मृतदेह, पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली

एकमत ऑनलाईन

   डी. के. इनामदार
परभणी : शहरातील कोतवाली पोलिस स्टेशनच्या हद्दीतील दि़. ८ जुलै पासून बेपत्ता असलेल्या शेख मैनुद्दीन शेख मंजुर वय २९ वर्ष या बेपत्ता व्यक्तीचा पोलिसांनी खाक्या दाखवताच पाच आरोपींनी खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या मृत व्यक्तीचा मृतदेह बोरवंड खुर्द परीसरातील कॅनलच्या बाजुला असलेल्या दाट झाडींमधून पोलिसांनी ताब्यात घेतला आहे

या प्रकरणी आरोपी सय्यद मतीन सय्यद करीम, शेख नदीम शेख रशीद, शारुख मिर्झा हुसेन मिर्झा, शाहबाज मिर्झा हुसेन मिर्झा, सय्यद हुसेन सय्यद करीम सर्व रा.परभणी यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला असून तीन आरोपींना पोलिसांनी अवघ्या दहा तासात ताब्यात घेतले आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये शेख मैनुद्दीन शेख मंजुर वय २९ वर्ष हे दि़. ८ जुलै पासून बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती़. या प्रकरणी फिर्यादी कोतवाली पोलिस स्टेशनचे शरद दामोदर ज-हाड यांनी आरोपी क्र.०१ याच्याकडे चौकशी केली असता पाचही आरोपींचे मृत व्यक्तीशी पैशांच्या तसेच दारू पिण्यासाठी पैसे मागीतल्याचे कारणावरून अजीजीया नगर, आकाश बेकरी समोर येथे दि़०८ जुलै रोजी रात्री ११़३० वाजता वाद झाल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यानंतर पाचही आरोपींनी संगनमत करून शेख मैनुद्दीन शेख मंजुर यास चाकुने वार करून जिवे मारले व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने बोरवंड खुर्द परीसरातील कॅनलच्या बाजुला असलेल्या गट नं. ३४९ गुलाब खान रोशन खान पठाण यांच्या शेतातील दाट झाडीत प्रेत पुरले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच तीन आरोपींना तात्काळ ताब्यात घेतल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी घटनेची कबुली देत शेख मैनुद्दीन यांचा खून केल्याचे सांगितले. त्यानंतर कोतवाली पोलिस निरीक्षक ज-हाड, सपोनि़तूरनर, बळवंत जमादार व कर्मचा-यांनी दि़२६ जुलै रोजी रात्री ११ वाजता तीन आरोपींना ताब्यात घेतले.

त्यानंतर बोरवंड खू़येथे भेट देवून आरोपींनी सांगितलेल्या ठिकाणी खोदकाम केले असता बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले़ त्यानंतर या ठिकाणी रात्रभर दैठणा पोलिस ठाण्याचे बिट जमादार बळीराम मुंढे, कोतवाली पोलिस ठाण्याचे के.आर.मुरकुटे, श्रीरंग डुकरे या तीन पोलिसांना तैनात करण्यात आले होते .

दुसरे दिवशी दि़. २७ जुलै रोजी तहसीलदार संजय बिराजदार, पोलिस निरीक्षक ज-हाड, स.पोनि.तुरनर, दैठण्याचे बिट जमादार बळीराम मुंढे, डॉ़मुद्दसीर जिकरे, डॉ़माने, डॉ सय्यद जुनेद अहेमद, ठसे तज्ञ व माती तज्ञ व सीआरपी कर्मचारी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत पुरलेल्या खड्ड्यातून शेख मैनुद्दीन शेख मंजुर यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर हा मृतदेह शव विच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आला.

या प्रकरणी पाचही आरोपीविरूध्द दि़. २७ जुलै रोजी सपोनि एस.ए. मान्टे यांनी कोतवाली पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणातील पाच पैकी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद ज-हाड यांच्या आदेशाने स.पो. नि. तुरनर करीत आहेत़ मृत शेख मैनुद्दीन शेख मंजुर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, चार मुले, भाऊ असा परीवारआहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या