26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeपरभणीपरभणीत वीज पडून बैल ठार

परभणीत वीज पडून बैल ठार

एकमत ऑनलाईन

परभणी : प्रचंड उकाड्यानंतर शुक्रवार दि. १० जून रोजी दुपारनंतर साडेचारच्या सुमारास आलेल्या जोरदार पावसात वीज कोसळून एकाचा बैल दगावल्याची घटना तालुक्यातील ब्रह्मपुरी शिवारातील घडली.

याविषयी माहिती अशी की ब्रह्मपुरी येथील शेतकरी संजय पंडितराव चव्हाण यांच्या शेतात पेरणीपूर्व मशागतीची काम सुरू होते. दुपारनंतर वातावरणात झालेल्या अचानक बदलाने साळापूरी व ब्रह्मपुरी शिवारात साडेचारच्या सुमारास जोरदार पाऊस कोसळू लागला. पावसापासून बैलांना निवारा मिळावा यासाठी धु-यातील लिंबाच्या झाडाजवळ उभे केले. यावेळी याठिकाणी वीज पडून घडलेल्या दुर्घटनेत त्यांचा एक बैल जागेवर दगावला. यामुळे ऐन पेरणीच्या सुमारास या शेतक-यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या