23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeपरभणीसभापतीच्या मुलाची महावितरण कर्मचा-यास मारहाण, गुन्हा दाखल

सभापतीच्या मुलाची महावितरण कर्मचा-यास मारहाण, गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

पूर्णा : फार्म हाउसची लाईट चालू कर असे म्हणून महावितरण कंपनीच्या कर्मचा-यास मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी महावितरण कर्मचा-यांने दिलेल्या तक्रारीवरून चुडावा पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कृषि उत्त्पन्न बाजार समिती सभापतीच्या मुलासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने तालुक्यात खळबळ उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील मौजे चुडावा येथील महावितरण कंपनीच्या उपकेंद्र कार्यालयावर कर्तव्य बजावत असलेले वरिष्ठ तंत्रज्ञानिक चंद्रप्रकाश धर्मपाल इंगोले (राÞप्रभात नगर नांदेड) यांना दि. ९ ऑगस्ट रोजी दुपारी २: ३० वाजताच्या सुमारास सभापती बालाजी देसाई यांचे चिरंजीव गोविंद देसाई, स्वप्नील देसाई (दोघे रा. चुडावा) यांनी आमच्या फार्म हाऊसची बंद झालेली लाईट का चालू करत नाही म्हणत मारहाण केली व जाती वाचक शिवीगाळ केली.

या प्रकरणी पीडित कर्मचारी इंगोले यांनी पूर्णेत धाव घेत वरिष्ठ अधिका-यांना सांगितले. तसेच दि. १० ऑगस्ट रोजी चुडावा पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केल्याने आरोपी गोविंद बालाजी देसाई, स्वप्निल रामकिशन देसाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपवि. अधिकारी गावडे करत आहेत. दरम्यान बातमी लिहीपर्यत आरोपीना अटक करण्यात पोलिसांना यश आले नव्हते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या