20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeपरभणीपरभणीत भारतीय मजदूर संघाच्या चेतना यात्रेचे फटाके फोडून स्वागत

परभणीत भारतीय मजदूर संघाच्या चेतना यात्रेचे फटाके फोडून स्वागत

एकमत ऑनलाईन

परभणी : महाराष्ट्रातील मजदुरांच्या विविध मागण्या संदर्भात मुंबई येथून भारतीय मजदुर संघांच्या वतीने चेतना यात्रा निघाली आहेÞ ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रातील मजदुरांच्या विविध मागण्याबाबत चेतना निर्माण करणार आहेÞ या यात्रेचे परभणी शहरात रविवार, दिÞ१३ नोव्हेंबर परभणी हेड पोस्ट ऑफिसमध्ये आगमन होताच फटाके फोडून स्वागत करण्यात आले.

भारतीय मजदूर संघाद्वारे संध्याकाळी चार वाजता जाहीर सभा घेण्यात आली. या वेळी मोहन येणुरे (भारतीय मजदुर संघ महामंत्री), श्रीपाद कुटासकर (प्रदेश संघटन मंत्री), विशाल मोहिते (सुरक्षा रक्षक महासंघाचे सरचिटणीस व प्रदेश सचिव), विŸगोÞपेंढारकर (नाशिक, धुळे, नंदुरबार विभाग संघटन मंत्री), दीपक गांगोडे (ठाणे जिल्हा नागरी सहकारी बँक कर्मचारी महासंघाचे कोषाध्यक्ष), संजय सुरोसे (बांधकाम कामगार महासंघ महामंत्री), निलेश खरात (महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार महासंघाचे अध्यक्ष), आनंद मोरे (सांगली जिल्ह्याचे संघटन मंत्री), संदीप बोंदरवाल (जालना जिल्हा कोषाध्यक्ष) उपस्थित होतेÞ विशेष पाहुणे म्हणून पोस्ट ऑफिसचे विनोद कुलकर्णी (सहाय्यक डाक अधीक्षक) परभणी उपस्थित होते.

या सभेला टपाल कर्मचारी, वीज कामगार कर्मचारी, एलआयसी कर्मचारी, एसटी महामंडळ कर्मचारी, महाराष्ट्र ग्रामीण बँक कर्मचारी इत्यादी उपस्थित होते. सभेचे आयोजन भारतीय मजदुर संघ, परभणी जिल्हा सचिव गणेश उपाध्ये, अध्यक्ष दादाराव शिंदे, प्रसाद डाफने, करतारंिसह ठाकूर, नितीन मुळे, संजू गुंजालकर, भागवत खूने, संजू पत्की, देविदास कठारे इत्यादींनी मिळून केले होतेÞ

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या