23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeपरभणीमानवत-मानोली रस्त्याची झाली दयनीय अवस्था

मानवत-मानोली रस्त्याची झाली दयनीय अवस्था

एकमत ऑनलाईन

मानवत : तालुक्यातील मानवत ते मानोली रस्त्याची सततच्या पावसामुळे दयनीय अवस्था झाली असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद विभाग यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याने ग्रामीण भागात संताप व्यक्त केला जात आहे.
मानवत तालुक्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.

अनेक गावातील ओढ्या-नाल्यातील पावसाच्या पाण्यामुळे पूल, रस्ते अतिशय खराब झाले आहेत. काही भागात प्रशासनाने रस्त्याची डागडूजी करणे सूरू केली पण मानोली ते मानवत रस्त्याकडे अजूनही लक्ष दिले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते अखेरची घटका मोजत आहे. या रस्त्यावरून चालणे अवघड झाले असून वाहन चालविणाठयांना तारेवरची कसरत करण्याची वेळ आली आहे.

खराब रस्त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास खुंटला आहे. खराब रस्त्यामुळे ग्रामीण जनतेमधून संताप व्यक्त केला जात आहे. मानोली या गावातून मानवत येथे दररोज दैनंदिन कामकाज करीत शेकडो नागरिक येत आहेत; परंतु त्यांना या दयनीय रस्त्यामुळे वाहने चालविणे अत्यंत जिकरीचे झाले असहे. या रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण देखील फार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

Read More  खळबळजनक प्रकार … 24 वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातील घेतले स्वॅब नमुने

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या