26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeपरभणीपूर्णा येथे वीस वर्षीय तरूणीचा आढळला मृतदेह

पूर्णा येथे वीस वर्षीय तरूणीचा आढळला मृतदेह

एकमत ऑनलाईन

पूर्णा : शहरातील रेल्वे परिसरातील तडीपार परीसरात २० वर्षीय अनोळखी मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. या मुलीची हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी घटनास्थळाची भेट देऊन पाहणी केली.

पूर्णा शहरातील रेल्वेच्या तडीपार परिसरात गुन्हेगारीचा अड्डा बनला आहे. याकडे पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याने पर गावातील गुन्हेगार वृत्तीचे लोक त्या ठिकाणी येऊन आसरा घेताना दिसत आहेत. रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी तडीमाराचा अड्डा बनला आहे. या परिसरात या आधी देखील खुनाच्या ब-याच घटना घडल्या आहेत. तरी देखील पोलिसांनी या परिसराकडे कानडोळा केला. या तडीपार परिसरात दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास झाडामध्ये २० वर्षीय मुलीचा मृतदेह जखमी अवस्थेत आढळून आला आहे. मुलीच्या अंगावर ब्लेडने वार करण्यात आले असल्याचे दिसत असल्याने सदर मुलीची कोणीतरी हत्या केल्याची शक्यता दर्शवली जात आहे.

पोलिसांना माहिती मिळताच रेल्वे तथा शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून परिसर सील केला आहे. घटनास्थळी श्वान पथक पाचारण करण्यात आले असून घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी पूर्णेत दाखल होऊन परिसराची पाहणी केली आहे. पोलीस सदर मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करीत आहे. या अनोळखी मुलीचे वय अंदाजे २० वर्ष, रंग गोरा, उंची ०५ फु., नाक सरळ, उभा चेहरा, वेणी साधारण लांब, अंगामध्ये लाल टॉप निळा पँट (पंजाबी ड्रेस) , काळा बुरखा, गळ्यामध्ये एक लाल पिवळा आणि काळा धागा, काना मधे तीन बाळ्या आहे. कोणास ओळख पटल्यास पूर्णा पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बातमी लिहीपर्यत या बाबत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता. पोलिस या प्रकरणी कसून चौकशी करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या