22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeपरभणीजिल्ह्यातील पालिका निवडणुकांचे पडघम वाजायला सुरू

जिल्ह्यातील पालिका निवडणुकांचे पडघम वाजायला सुरू

एकमत ऑनलाईन

सेलू (संतोष शिंदे) : महानगरपालिका सोबतच आता जिल्यातील सातही नगरपालिकेत निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. मुदत संपणा-या नगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचना करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सातही नगरपालिकामध्ये इच्छुकांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. नगरपालिका प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम ७ ऑक्टोबर पासून सुरु झाले असून १५ दिवसात कच्चा आरखडा निवडणूक आयोगाला सादर करण्याचे जिल्हाधिका-यांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे युद्धपातळीवर हे काम चालू आहे. त्याचप्रमाणे नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करावी लागणार आहे.

सेलू नगर परिषद निवडणूक २०२१साठी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या ७ ऑक्टोबरच्या निर्देशानुसार १२ प्रभागाच्या रचनेच्या कच्च्या आराखड्यांचे काम गोपनीय पद्धतीने सुरु आहे. त्यानुसार मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांच्या अध्यक्षतेखाली ४ कर्मचा-यांच्या समितीकडून प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरु आहे. विद्यमान नगरसेवकांची संख्या २४ असल्याने हीच संख्या कायम राहून एका प्रभागात २ सदस्य निवडणूक लढवणार आहेत. ही प्रभाग रचना २०११ च्या जनगणनेनुसार होणार आहे. त्या वेळी सेलूची लोकसंख्या ४९ हजार ९१५ अशी असल्याने व नवीन मतदार नोंदणी झाल्यामुळे आता अंदाजे प्रत्येक प्रभाग हा ३५०० ते ४००० लोकसंख्येचा असणार आहे. त्यामधील प्रारूप मतदार यादी ही अंतिम करण्यात येणार आहे. कच्चा आराखडा तयार झाल्यानंतर तो निवडणूक आयोगाला मंजुरीसाठी पाठवावा लागणार आहे. या प्रभागात नेमके काय बदल होतात हे मंजुरीनंतर समजणार आहे. तसेच याशिवाय आरक्षण व महिला आरक्षण याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आता प्रभागांना अनुक्रमांकासोबत नावही असणार
प्रभाग रचना सुरु करताना सर्वप्रथम उत्तर दिशेकडून सुरुवात होणार असून उत्तरेकडून ईशान्य (उत्तर पूर्व ), नंतर पूर्व दिशेकडे येऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभाग रचना करावी व शेवट दक्षिण दिशेला करावा. तसेच प्रभागाला अनुक्रमांकही त्याच पद्धतीने देण्यात यावेत. तसेच त्या प्रभागांना नावही देण्याचे अधिकार निवडणूक आयोगाने नगर पालिका प्रशासनास दिले आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या