19.6 C
Latur
Sunday, February 5, 2023
Homeपरभणीपूर्णा शहरात पसरले घाणीचे साम्राज्य

पूर्णा शहरात पसरले घाणीचे साम्राज्य

एकमत ऑनलाईन

पूर्णा : शहरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहेÞ सार्वजनिक मुतारींची अतिशय दुरवस्था झाली आहेÞ शहरातील विविध भागातील नाल्या तुडुंब भरल्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भिती व्यक्त होत असून शहरात स्वच्छता मोहीम राबवण्याच्या मागणीसाठी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

पूर्णा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी भाजी मंडई लगत असलेली सार्वजनिक मुतारीची स्वच्छता ठेवण्यात येत नाहीÞ त्यामुळे या मुतारीच्या दुर्गंधीमुळे परीसरातील नागरिक त्रस्त झाले आहेतÞ त्यामुळे या परीसरातून जाणा-या नागरीकांना नाकाला रुमाल लावून जावत आहेÞ या मुतारीची स्वच्छता करण्यात यावी व या ठिकाणची घान वाहून जाण्यासाठी नळाची व्यवस्था करण्यात यावीÞ तसेच दररोज निजंर्तुकीकरण औषधी अथवा फिनेल टाकून स्वच्छता करावीÞ मुतारीच्या शेजारील भिंती लगत घाणीचे साम्राज्य पसरलेले असते ते दररोज स्वच्छ करावेÞ मुतारीच्या घाणीने डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. जवळच भाजीपाला, फळे व फुलाचे मार्केट असून माशा व डास त्या भाजीपाल्यावर जाऊन बसतातÞ त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. एकीकडे बदललेल्या हवामानामुळे नागरिक त्रस्त असताना दुसरीकडे शहरातील ठिकठिकाणी पसरलेल घाणीच साम्राज्याामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

त्यामुळे मुतारीची तात्काळ स्वच्छता करण्यात यावीÞ तसेच शहरामध्ये विविध भागांमध्ये तुडुंब भरलेल्या नाल्या स्वच्छ करण्यात याव्यातÞ तसेच संपूर्ण शहरांमध्ये धूर फवारणी करण्यात यावीÞ मुख्याधिकारी यांनी वरील विषयी गांभीर्याने घेऊन शहर स्वच्छ व सुंदर हा उपक्रम राबवण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशील गायकवाड, शेख जुबेर शेख हबीब, जगजागृती सेनेचे अध्यक्ष अनिल नरवाडे यांनी निवेदनाद्वारे केली आहेÞ

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या