37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeपरभणीजिंतुरात कम्युटेशन लाभ न देताच कुटुंब सेवानिवृत्ती वेतनातून वसुली

जिंतुरात कम्युटेशन लाभ न देताच कुटुंब सेवानिवृत्ती वेतनातून वसुली

एकमत ऑनलाईन

जिंतूर : येथील एका मयत शिक्षिकेच्या वारसदरास कम्यूटेशन (अंश राशिक)ची रक्कम १२ लाख १३ हजार ४६० साठ न देताच जिल्हा परिषदेकडून वारसाच्या कुटुंब सेवानिवृत्ती वेतनातून दरमहा १२ हजार ८० रुपयांची कपात होत आल्याची तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीने खळबळ उडाली असून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

येथील जि.प.सेवानिवृत्त कर्मचारी सेवा संघ अध्यक्ष एम.के.कादरी यांनी पेंशन अदालच्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, जिंतूर येथील जि.प.प्राथमिक उर्दु कन्या शाळेतील शिक्षिका बेबी शहनाज यांचा सेवानिवृत्ती प्रस्ताव एप्रिल २०१९ मध्ये जिल्हा परिषदेकडे दाखल करण्यात आला. त्यानंतर ३१ मे २०१९ रोजी त्या सेवानिवृत्त झाल्या आणी १८ जूलै २०१९ रोजी त्या मयत झाल्या. त्यांचे वारसदार पती मोहम्मद सगिरअहमद खान यांना रितसर कुटुंब सेवानिवृत्ती वेतन मंजूर होऊन ते मिळू लागले. उपदान, भविष्य निर्वाह निधी इत्यादी लाभ त्यांना मिळू लागले. परंतु कम्यूटेशनचा आर्थिक लाभ त्यांना उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी मंजूर करूनही मिळाला नाही. कम्यूटेशन रकमेची दरमहा १२ हजार ८० रुपये त्यांच्या कुटुंब सेवानिवृत्ती वेतनातून वसुली होत आली आहे. उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी गट विकास अधिकारी जिंतूर यांना २५ सप्टेंबर २०१९ च्या आदेशाद्वारे १२ लाख १३ हजार ४६० रुपये कम्यूटेशन रक्कम निर्गमीत करण्याचे व १२ हजार ८० रुपये दरमहा वसूलीचे आदेश निर्गमीत केले होते.

गटशिक्षणाधिकारी जिंतूर यांनीही २२ नोव्हेंबर २०१९ च्या पत्राने गटविकास अधिकारी पंचायत समिती जिंतूर यांना मयत झाल्या आहेत. वारसदार मोहम्मद सगिरअहमद खान याना कुटुंब सेवानिवृत्ती वेतन धारकाच्या खात्यात आर्थिक लाभ अदा करण्यात यावेत. कुटुंब सेवानिवृत्ती वेतन धारक या नात्याने शहनाज यांची कम्यूटेशन रक्कम मिळावे म्हणून जि. प.शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचेकडे १६ जून २०२० आणी २८ सप्टेंबर २०२० रोजी लेखी अर्ज सादर केले. परंतू या प्रकरणी कार्यवाही होत नसल्याने ८ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांनी कादरी यांचेकडे सर्व कागदपत्रे सहीत तक्रार अर्ज सादर केला. याबाबत कादरी यांनी कादरी यांनी टाकसाळे यांच्याकडे तक्रार केल्याने सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.

पेंशन अदालतमधून न्याय मिळेल : कादरी
मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी सेवानिवृत्त व वंचित जिल्हा परिषद कर्मचा-यांसाठी पेंशन अदालत सारखे व्यासपिठ उपलब्ध करून दिले असून या बद्दल आपण त्यांचे आभार व्यक्त करतो. या व्यासपिठावरून कुटुंब सेवानिवृत्ती वेतनधारक मोहम्मद सगिर अहमद खान यांना निश्चितच न्याय मिळेल असा आपल्याला पूर्ण विश्वास असल्याचे मत जि.प.सेवानिवृत्त कर्मचारी सेवा संघाचे तालुकाध्यक्ष एमक़े. कादरी यांनी व्यक्त केले.

महिलांचा हक्क का नाकारला जातोय?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या